{"product_id":"nirakar","title":"NIRAKAR (निराकार)","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eनिराकार\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइंदिरा संत यांची कविता आपल्या अमलान सौंदर्यामुळे आणि उत्कट, अंगभूत सामर्थ्यामुळे, गेले अर्धशतक संवेदनशील वाचकांशी संवाद करत राहिली आहे. इंदिराबाईंचे नितळ व्यक्तिमत्त्व, खोल जाणीव आणि स्वाभाविक शैली या गुणांमुळे त्यांची कविता स्वतःची विशिष्टता सतत राखत आली आहे. संथपणे वाढत-विकसत असताना ही कविता आपल्या अनुभवाचा कंद जपत राहिली. त्यामुळे तिच्या गतीमध्ये सुसूत्रता अबाधित राहिली. संचिताचा त्याग न करताही 'नवीन' होण्याची अद्भुत किमया या कवितेला साधली आणि बदलत्या समकालीन प्रवृत्तींशी अभिमुख राहूनही 'स्वत्वा' पासून न ढळण्याचे धैर्य या कवितेने दाखवले. स्वतःच्या आंतरिक प्रेरणेशी अभंगनिष्ठा म्हणजे इंदिराबाईंची कविता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch3\u003e\u003cspan\u003eलेखक : इंदिरा संत \u003cbr\u003eप्रकाशन : पॉप्युलर प्रकाशन \u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52831668961602,"sku":null,"price":157.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/nirakar-f.jpg?v=1775113861","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/nirakar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}