{"product_id":"pakshivedh-पक्षिवेध","title":"Pakshivedh (पक्षिवेध)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपक्षिवेध\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपक्षी बघणे हा आनंददायी छंद आहे. एकदा का तो आपल्याला जडला की आपण त्याच्यात हळूहळू रमून जातो. या छंदामुळे आपली निरीक्षण आणि आकलनशक्ती वाढत जाते. हळूहळू आपल्याला पक्षी कळू लागतात. पक्ष्यांचे अधिवास उलगडू लागतात. पुढची पायरी म्हणजे आपण पक्षी अभ्यासक बनतो. निसर्गाचे काळजीवाहक बनतो. यातूनच मग आपण अनुभवलेले पक्षिविश्व अन् निसर्गानुभव इतरांना वाटण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रसारित करीत असतो. त्यातून निसर्गाचे संगोपण व्हावे ही सुप्त इच्छा असतेच. 'पक्षिवेध'चे लेखक दीपक गुडेकर हे याच वाटेवरील प्रवासी. पक्ष्यांची छायाचित्रे काढता काढता ते पक्षी अभ्यासक झाले. पक्ष्यांसाठी त्यांनी तासन्तास, कित्येक दिवस जंगलात अन् पाणवठ्यावर घालविलेत. निसर्ग आणि पक्ष्यांना अनुभवले, जंगल-वाचन केले. पक्ष्यांचा मागोवा घेताना त्यांनी महत्त्वाची गोष्ट केली, ती म्हणजे पक्षिनिरीक्षण आणि जंगलवाचनातील अनुभवांच्या नोंदी केल्यात. विशेष म्हणजे ह्या नोंदी प्रत्यक्ष भटकंतीतून आलेले अनुभव त्यांनी आपल्या लेखनातून वाचकांसाठी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेत. त्यांच्या पक्षिनिरीक्षणातील ह्या रंजक नोंदी आता \"पक्षिवेध\" मधून एकत्रितपणे वाचकांसाठी उपलब्ध होत आहेत. पक्षिवेध वाचत असताना पक्षिनिरीक्षकांना ही आपलीच निरीक्षणे आणि अनुभव आहेत असे वाटेल आणि वाचकांना हे पुस्तक वाचून पक्षी, प्राणी आणि त्यांच्या रानातील निसर्ग नवलाईचे निश्चित दर्शन होईल. त्यांच्या या लिखाणातून आपल्याला अनेक पक्षी भेटतील, मध्येच काही प्राणीसुद्धा भेटतील आणि जंगल उलगडून बघता येईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. दीपक गुढेकर \u003cbr\u003eप्रकाशक. साहित्य प्रसार केंद्र  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51852010815810,"sku":"9788195808458","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PakshivedhF.jpg?v=1768736754","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pakshivedh-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a7","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}