{"product_id":"palyadee-bhasha-alyadee-jeevane","title":"Palyadee Bhasha Alyadee Jeevane (पल्याडी भाषा आल्याडी जीवने)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपल्याडी भाषा आल्याडी जीवने\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकुठलीही निर्मिती हा आत्मशोधच असतो. म्हणूनच सर्व भारतीय वैशिष्ट्यांचे चित्रण करण्यासाठी, भावनांना अभिव्यक्ती देण्यासाठी विविध भारतीय भाषांमधून वाङ्मयनिर्मिती झाली. कारण भाषा हे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. इंग्रजीचा आपल्या लेखकांवर जास्त प्रभाव असल्याने त्या त्या काळातील नवीन पिढीचा कल इंग्रजीकडे जास्त दिसतो. शिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीयांचेदेखील लिखाण इंग्रजीत झाल्याने तेही भारतीय इंग्रजी साहित्य समजले जाते. रूथ प्रवर झाबवाला, निस्सीम इझिकेल, मुल्कराज आनंद, व्ही. एस. नायपॉल ही काही उदाहरणं. नवीन दमाचे लेखक विक्रम सेठ, अरुंधती रॉय यांना विसरून चालणार नाही. नोबेलविजेत्या टागोरांपासून मुल्कराज आनंद, राजा राव, आर. के. नारायण, अनिता देसाई, शशी देशपांडे यांच्या कादंबऱ्या, निस्सीम इझिकेल, कमला दास, जयंत महापात्रा, पार्थसारथी, अरुण कोलटकर यांच्या कवितांना कोणतेही निकष लावले तरी ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, हे नाकारता येणार नाही. नायपॉलना नोबेल पुरस्कार आणि विक्रम सेठ, अरुंधती रॉय, किरण देसाई यांना बुकर पुरस्कार मिळाले आहेत. या सर्वांच्या लेखनात भारतीय अस्मिता, संवेदनशीलता प्रतीत होते. भौगोलिकदृष्ट्या लेखकांचे वर्गीकरण केले तरी मूळ प्रेरणा जीवनमूल्ये सर्वत्र तीच असतात. म्हणून भारतीय इंग्रजी लेखकांचे स्थान साहित्यविश्वात खासच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. पुरुषोत्तम देशमुख \u003cbr\u003eप्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स  \u003cbr\u003e  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52916280426818,"sku":"VARN0002","price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PalyadiAlyadiJivaneF.jpg?v=1775976083","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/palyadee-bhasha-alyadee-jeevane","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}