{"product_id":"parichay-atulya-bharatacha","title":"Parichay Atulya Bharatacha (परिचय अतुल्य भारताचा !)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eParichay Atulya Bharatacha (परिचय अतुल्य भारताचा !)\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वातंत्र्यवीर सावरकरांची शौर्यगाथा सांगणारं अंदमान, अहिल्याबाईंची कर्मभूमी असलेलं माहेश्वर, एकनाथजी रानडे यांच्या 'एक जन्म, एक ध्येय' या वचनातून साकारलेलं कन्याकुमारीचं विवेकानंद रॉक मेमोरियल, श्री रामदासस्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली शिवथरघळ, योगी अरविंदांचा आध्यात्मिक संदेश जगभर पोचवणारं पुदुचेरी, दत्तात्रेयांचे अक्षय निवासस्थान गिरनार पर्वत...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वांत प्राचीन नगरी काशीमधील गंगातीरावरील काशी विश्वनाथ, सततच्या मुघल आक्रमणात विध्वंस होऊनही विजिगिषु वृत्तीतून पुनर्निर्मित झालेलं भव्य सोमनाथ मंदिर, नर्मदेच्या तटावरील ओंकारेश्वर, राजा विक्रमादित्यच्या उज्जयिनीतील क्षिप्रेकाठचं महाकालेश्वर, हिंद महासागर व बंगालच्या उपसागराने वेढलेल्या शंखाकृती बेटावरील रामेश्वरम्, हिमालयाच्या कुशीतील मंदाकिनी नदीवरील केदारनाथ...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचालुक्यकालीन सौंदर्याने नटलेलं बदामी व ऐहोळे, भव्य मंदिरांचं कांचीपुरम, आठव्या शतकातील पल्लव साम्राज्याचं महाबलीपुरम, राणी रुपमतीच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं मांडू, प्रसिद्ध इंग्लिश संगीतचमू बीटल्सनासुद्धा भुरळ घालणारं ऋषिकेश, ग्रामीण जीवनाचा प्रसन्न अनुभव देणारी तेलंगणमधील छोटी गावं...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजे निव्वळ प्रवासवर्णन नाही, तर स्वच्छंद भटकंतीतून, डोळस नजरेने अतुल्य भारताची विविधता, सौंदर्य, इतिहास व परंपरा यांचा परिचय करून देणारा अनुभवसंपन्न लेखाजोखा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: आशिष काशीकर \u003cbr\u003eप्रकाशक: आशिष विवेक काशीकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56007152173378,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/parichaybharatacha-f.jpg?v=1787815729","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/parichay-atulya-bharatacha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}