{"product_id":"parivartanvadi-itihas","title":"Parivartanvadi Itihas (परिवर्तनवादी इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eनाशिक जिल्ह्यातील वंचितांचा\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eपरिवर्तनवादी इतिहास\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवंचितांच्या समाजजीवनातील परिवर्तन महाराष्ट्रातील समाजजीवन घडणीची स्वतःची अशी धाटणी आहे. महाराष्ट्रीय समाजधाटणीवर रूढी, परंपरा, चाली-रीती, आचार-विचार, उच्चारपद्धती, खाण्याच्या सवयी, पोशाख, दागिने या सर्वांचा मोठा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्राचा पूर्व इतिहास पाहता व्यापार-स्थलांतर, धर्मप्रसार व साम्राज्यविस्तार या निमित्ताने अनेक लोकसमूह येत राहिले. त्याचा परिणाम तत्कालीन समाजजीवनावर झालेला आपणांस दिसत आहे. समाजजीवनात नवनवे कायदे आणि सुधारणांमुळे नव्या-जुन्यांत संघर्ष निर्माण होणे अटळ होते. यातून संघर्षाचा नवा प्रश्न महाराष्ट्रीय समाजात उद्भवला. त्याला आपला नाशिक जिल्हादेखील अपवाद राहिला नाही. कायदे व सुधारणांनी व्यक्तीवरील बंधने शिथिल केल्याने त्याचा विस्तार व विकास झाला. स्वातंत्र्यानंतर आपण संविधान स्वीकारले. त्यात लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्म निरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ह्या जीवनमूल्यांचा अंगीकार करून अस्पृश्यता, अंधश्रद्धामुक्त समाजनिर्मितीचे ध्येय स्वीकारले. आपण स्वातंत्र्याच्या गेल्या ७५ वर्षांच्या इतिहासात समाजातील सामाजिक, आर्थिक विषमता दूर कल शकलो नाही. हे वास्तव नष्ट करता येणार नाही. नाशिक जिल्ह्यात वंचितांच्या बाबतीत अशी विषमता आढळून येत होती. सदर पुस्तकात याविषयी वंचित समाजजीवनातील परिवर्तन एक उत्कृष्ट अभ्यास व त्याची मांडणी करण्यात आलेली आहे. भारतीय वंचित चळवळीची अशी विशिष्ट पार्श्वभूमी आहे. त्याच प्रकारची पार्श्वभूमी महाराष्ट्र (नाशिक) वंचित समाज जीवनातील चळवळींना आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखक : प्रा. डॉ. जी. डी. रुपवते\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67642254754114,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PARIVARTANVADIITIHASF.jpg?v=1791017665","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/parivartanvadi-itihas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}