{"product_id":"parnsrishti","title":"Parnsrishti (पर्णसृष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपर्णसृष्टी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eपाने या वनस्पतींच्या महत्वाच्या पण दुर्लक्षित अंगाविषयी या पुस्तकात संकलित केलेली विस्तृत माहिती विस्मयकारक आहे. इंधन जाळून आपण निर्माण करत असलेला कार्बन डायॉक्साईड पानांमधून शोषला जातो हा फुले-फळांखेरीज वनस्पतींचा माणसाला होणारा खरा जीवनदायी उपयोग आहे, कारण पानासारखे यंत्र माणूस अजूनही निर्माण करू शकलेला नाही. दुर्दैवाने आपण अमर्यादित इंधन जाळून झाडांकडून अवास्तव अपेक्षा करतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपानांतील रंग, आकार, रचना यातील विविधता झाडांचे सौंदर्य खुलवतात. पानांतली हीच वैशिष्ट्ये वनस्पतींची खरी ओळख पटवतात. ही वैशिष्ट्यपूर्ण माहिती आपण विस्ताराने दिली आहे. त्यामुळे वनस्पतींची आणि बागकामाची आवड असणा-यांचे शंका निरसन तर होईलच शिवाय त्यांना पानांची संपूर्ण माहिती या पुस्तकातून मिळणार आहे. घरात आपल्या आवडीची झाडे निवडण्यासाठी या पुस्तकाची मदत होईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरंगीत फुले आणि रसभरीत फळे नसतानाही झाडांकडे निसर्गप्रेमींचे लक्ष वेधण्याचे काम पर्णसृष्टी हे पुस्तक करेल हे नक्की!_\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eश्रीकांत इंगळहळीकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सौ. आशा उंगावकर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56231799783746,"sku":"CON0656","price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PARNASRISJTOF.jpg?v=1790066163","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/parnsrishti","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}