{"product_id":"phalsamruddhi","title":"Phalsamruddhi\t(फळसमृद्धी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePhalsamruddhi    (फळसमृद्धी)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसौ. आशा उगांवकर यांचे 'फळसमृद्धी' हे पुस्तक आजपर्यंत मराठी निसर्ग साहित्यात रुळली नसलेली, त्यांनीच चोखाळलेली वाट रूढ करते. आजपर्यंतच्या बहुतांश वृक्षसाहित्यातली पुस्तके एखाद्या वनस्पतीचे अखंड वर्णन करणारी आहेत. उगांवकरांनी मात्र वनस्पतीचे ‘फलफुलपर्णादी’ भाग घेऊन त्या प्रत्येकावर वेगळे लिखाण केले आहे. त्यांची पानांवर, फुलांवर लिहिलेली पुस्तके या आधीच वाचकांनी वाखाणली आहेत. पण या सगळ्या पुस्तकांत शीर्ष असणारे 'फळसमृद्धी' नावाचे पुस्तक म्हणजे त्यांच्या लिखाणाची एकार्थे फलश्रुतीच आहे. फळांची वर्णने करण्यासाठी फळांइतकीच रसाळ भाषा, त्यात जागोजागी संत वाङ्मयाचे संदर्भ, अनेक ओळखीची अन् चटकन भावतील अशी उदाहरणे यामुळे हे पुस्तक वाचताना धमाल येते. हे लिखाण कधी फळबाजाराचा फेरफटका मारून येते, तर कधी खारफुटी वनात भटकंती करते. कधी फळांच्या आकारामधली, रंगामधली, चवींमधील विविधता उलगडून दाखवते तर कधी या फळांचा मानवी संस्कृतीच्या विकासातील वाटा अधोरेखित करते. बीज अंकुराणापासून ते पक्व बीजांपर्यंतचा तसेच माणदेशापासून ते कोकणामधल्या विविधतेने नटलेल्या फळांपर्यतचा थक्क करणारा प्रवास या पुस्तकात उलगडत जातो. हे सोप्या भाषेतले, वाचकाला सहज भावेल असे लिखाण असूनही पुस्तक कुठेही शास्त्रीय बैठक सोडत नाही. सर्व निसर्गप्रेमींनी आवर्जून वाचावा असा हा चविष्ट मेवा तुमच्यासमोर सौ. उगांवकर यांनी सादर केला आहे. तुमच्या वाचन आनंदातूनच ही फळांची विस्मयकारक पण वाचकाला आधी फारशी माहित नसलेली कहाणी सुफळ संपूर्ण होईल.\u003cstrong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सौ. आशा उगांवकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67796621525314,"sku":"MIHA0223","price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/phalsamrudhi-f.jpg?v=1792324868","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/phalsamruddhi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}