Akshardhara Book Gallery
Phulpakharu ( फुलपाखरू )
Phulpakharu ( फुलपाखरू )
Share
Couldn't load pickup availability
Author: Shripad Brahme
Publisher: BookGanga Publications
Pages: 105
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
फुलपाखरू
मनातल्या मनात आई आणि बाबांचं घट्ट धरलेलं बोट सोडून देऊन एकट्याने सगळं काही करावं, असं वाटणाऱ्या वयाच्या या कथा!
सगळं जग लहान समजत असताना आपण मोठ्ठे झालोय, खूप शहाणे झालोय याची खात्री वाटणाऱ्या वयातल्या या कथा!
मनात एकाच वेळी धडधड, भीती, संताप आणि हुरहुर जाणवत असतानाच आनंद, खुशी, उत्साह, आत्मविश्वास आणि cool वाटणाऱ्या वयाची कोडीही मजेशीरच असतात, नाही का? इतर कुणालाच काहीही कळत नसतं, पण आपण किती chill असतो!
जिन्याच्या पहिल्या पायऱ्या जपून चढल्यावर एकदम वरच्या पायऱ्यांवर भर्रकन जावंसं वाटत असतं. तसंच आत्ताही होतं. पण... पहिल्या आणि वरच्या पायऱ्यांच्या मधल्या पायऱ्या खरं किती शहाण्या असतात, माहितीय? त्यांच्यावर जरासं थांबून वर बघायलाही मजा येते आणि मागे वळून बघितल्यावरही भीतीच पळून जाते.
या गोष्टी वाचताना प्रत्येकाला आपलं टीनएज आठवेल... त्या वयातल्या अनुभवांनी किती शहाणं केलं, हे लक्षात येईल आणि मॅच्युरिटीच्या काठावर कसं आणून पोचवलं, हेही जाणवेल.
कुमारवयीन मुलांच्या मनातला मोरपंखी कोलाज... फुलपाखरू !
प्रकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
