{"product_id":"poorvartika","title":"Poorvartika (पूर्वार्तिका)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003ePoorvartika (पूर्वार्तिका)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'नात्याला नाव न मिळणं म्हणजे प्रेम संपणं नव्हे... कारण काही वेळा ते नियतीच्या वळणावर पूर्णत्वाला जाऊ शकलं नाही म्हणून अधुरं राहतं! प्रेमाची अर्धवट राहिलेली गोष्ट जेव्हा नियती आणि विज्ञानाच्या अजब खेळाने एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबते!'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशाळेच्या बाकावर सुरू झालेली एक हळवी ओढ... कॉलेजात फुललेलं अव्यक्त प्रेम... आणि परिस्थितीच्या वादळात एकाकी पडलेली एक तमिळ ख्रिश्चन मुलगी, पूर्वा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदुसऱ्या बाजूला, आयुष्याच्या उद्विग्न वळणावर जुन्या आठवणींचा भार वाहणारा राधेश, आणि त्याच्या आयुष्यात आशेचा किरण बनून आलेली त्याची पत्नी, वर्तिका! सगळं काही सुरळीत सुरू असतानाच... एका क्षणात आयुष्याची वीण उसवते. नात्यांचे पदर विस्कटतात, विश्वास डळमळतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण ही कथा केवळ एका जुन्या प्रेमाची किंवा पती-पत्नीच्या नात्यातल्या विश्वासाची नाही; ही आहे नियती आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीची कहाणी. ज्या प्रेमाचा शेवट कित्येक वर्षांपूर्वीच झाला होता, ती अपूर्ण कहाणी पूर्ण करण्यासाठी नियतीने विज्ञानाचा असा कोणता खेळ रचला होता?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका प्रेमकथेपासून ते आजच्या काळातील ज्वलंत सामाजिक वास्तवाचा प्रवास घडवणारी, उत्कंठावर्धक आणि मनाला भिडणारी एक अद्भुत कादंबरी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही कहाण्यांचा शेवट हा केवळ पूर्णविराम नसतो, तर तो एका नवीन युगाचा आरंभ असतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: आकाश बळवंते \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67638946627906,"sku":null,"price":292.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/purvartika-f.jpg?v=1790936087","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/poorvartika","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}