{"product_id":"pranjalache-aarse-bhag-1-v-2-sanch","title":"Pranjalache Aarse Bhag 1 v 2 Sanch (प्रांजळाचे आरसे भाग १ व २ संच)","description":"\u003cpre class=\"tw-data-text tw-text-small tw-ta\" id=\"tw-source-rmn\" role=\"text\" tabindex=\"-1\"\u003e\u003cstrong\u003ePranjalache Aarse Bhag 1 v 2 Sanch\u003c\/strong\u003e\u003c\/pre\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रांजळाचे आरसे भाग १ व २ संच \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्र ज्ञान महामंडळ रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना ‘प्रांजळाचे आरसे' \u003cbr\u003eहा ग्रंथसंच प्रसिद्ध होतो आहे. या ग्रंथसंचाच्या दोन भागांत एकूण छत्तीस कर्तबगार लोकांच्या \u003cbr\u003eमुलाखती आहेत. समोरची भूमी खडकाळ असताना आणि पीक उगवून येण्याची निश्चिती \u003cbr\u003eनसतानाही वर्षानुवर्षे नांगर चालवण्याची मानसिक ताकद असणाऱ्या कृषकाशी नाते सांगणारी \u003cbr\u003eया साऱ्यांची जीवनगाथा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथसंचातल्या विख्यात व्यक्तींचे यश आपल्याला आज दिसते. मात्र कसोटीच्या प्रसंगी त्यांनी \u003cbr\u003eकेलेल्या निवडीची मोजावी लागणारी मोठी किंमत, शिणलेल्या चेहऱ्यावरची हताशा, निराशेच्या \u003cbr\u003eक्षणी ढाळलेले अश्रू, स्वत: स्वीकारलेले जबाबदारीचे दडपण हे आपल्याला सहसा दिसत नाही. \u003cbr\u003eवेगवेगळ्या संधी आणि यशप्राप्तीच्या अनेक शिड्या उपलब्ध असताना योग्यायोग्य ठरवण्याचा \u003cbr\u003eनीरक्षीरविवेक असणे दुर्लभ. शिवाय नैतिकता बाळगत असतानाच भावनाशून्य होऊन यांत्रिकपणे \u003cbr\u003eनिर्णय न घेता भोवतालच्या माणसांचा विचार करणे, मनात करुणेचा झरा वाहता ठेवणे अतिदुर्मीळ \u003cbr\u003eअसते. या सगळ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये मात्र तत्त्वनिष्ठेमुळे येणारा कोरडेपणा नाही, तर माणुसकीचा \u003cbr\u003eओलावादेखील आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथसंचाच्या निमित्ताने अशा श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनप्रवासाचे केले गेलेले दस्तावेजीकरण आताच्या \u003cbr\u003eआणि पुढच्या पिढ्यांसाठी मोठाच ठेवा ठरणार आहे.\u003cbr\u003e\u003cstrong\u003eविवेक सावंत\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमुख्य मार्गदर्शक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक : सुरेंद्र ग्रामोपाध्ये \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55823724151106,"sku":"MAHR0001","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PRANJALCHEARSEPART1F.png?v=1786102031","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pranjalache-aarse-bhag-1-v-2-sanch","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}