{"product_id":"pravah-rhinecha","title":"Pravah Rhinecha (प्रवाह ऱ्हाईनचा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रवाह ऱ्हाईनचा \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवेध जर्मन संस्कृतीचा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकधी एखाद्या प्रवासानं तुमचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे का? एखाद्या नव्या भूमीत पाऊल ठेवताक्षणी\u003cbr\u003eतुमच्या मनात स्वत:ला नव्यानं ओळखण्याची एक कथा सुरू होते. या पुस्तकातही अगदी अशीच एक \u003cbr\u003eकथा आहे. एक जिज्ञासू भारतीय तरुणी जगाचा अनुभव घेण्याच्या आणि स्वतःला घडवण्याच्या तयारीनं \u003cbr\u003eजर्मनीसारख्या शांत, शिस्तबद्ध आणि विचारप्रधान देशात पोहोचते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिथं तिला असंख्य प्रश्न पडतात. इथली माणसं अशी का जगतात ? त्यांचा निसर्गाशी इतका स्नेह कसा? \u003cbr\u003eशिस्त हा त्यांच्या जगण्याचा केंद्रबिंदू कसा झाला असेल? या संस्कृतीतून मला काय नवं शिकता येईल? \u003cbr\u003eया प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधार्थ सुरू झालेल्या या प्रवासात ती अंतर्बाह्य बदलते. या पुस्तकातलं प्रत्येक \u003cbr\u003eप्रकरण म्हणजे तिच्या प्रवासातला एक थांबा आहे. कधी जर्मनीच्या कुटुंबप्रणालीतली संवेदनशीलता, \u003cbr\u003eकधी भोजनशैलीतला साधेपणा, तर कधी कला-संगीत-इतिहासातलं गूढ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशहरांचे आवाज, ग्रामीण भागातली सकाळ, हिमवर्षावातली शांतता, ऑक्टोबरफेस्टचे रंग, ख्रिसमस \u003cbr\u003eबाजारांची ओढ, लोकांच्या जीवनशैलीतला काटेकोरपणा, आर्थिक सामर्थ्य, शिक्षणातली पारदर्शकता \u003cbr\u003eअशा सर्व पैलूंना हे पुस्तक स्पर्शकरतं...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक वाचकाच्या विचारांना चालना देतं. लेखकानं या पुस्तकातल्या प्रत्येक प्रकरणाला वास्तवाचा \u003cbr\u003eस्पर्श दिला आहे. हे पुस्तक केवळ 'जर्मनी' या देशाची सफर घडवत नाही, ते शांतपणे आपल्या मनात \u003cbr\u003eघर करतं. तुम्हालाही स्वतःला नव्यानं अनुभवायचं असेल, तर हे पुस्तक त्यासाठी नक्की मदत करेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : सिद्धेश आरती श्याम वकील\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56186635157826,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PravahRhinechaf.jpg?v=1789563762","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/pravah-rhinecha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}