{"product_id":"putta","title":"Putta (पुट्टा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eपुट्टा\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी स्वभाव व मानवी मन हे नेहमीच प्रेमाच्या शोधात असते. ते कधी व कोणाकडून भेटेल हे कोणीही सांगू शकत नाही. कादंबरीतील माणसांच्या नात्यांचे, त्यांच्यातील भावभावनांचे, एकमेकांमधील अंतर्क्रियांचे अतिशय तटस्थ राहून केलेले वास्तव चित्रण भावते. सर्व व्यक्तिरेखांमधील 'माणसा'ची ओळख पटून अधिकाधिक माणूस होण्याची प्रक्रिया सुरू होते. जगात किती वेगवेगळ्या प्रवृत्त्या असतात. त्यांना चौकटीबद्ध दृष्टिकोनातून पाहण्यात काय अर्थ आहे? माणूस खरा-खोटा नसतो. तो फक्त माणूस असतो एवढी साधी कल्पना बऱ्याचदा पचनी पडत नाही. व्यक्तिरेखा जिवंत होतात, जेव्हा लेखक त्यांना स्वतःचा विचार करू देतो.. आणि तेच मांडतो... जे त्या व्यक्तिरेखेला म्हणायचे असते आणि म्हणूनच 'पुट्टा'मधील व्यक्तिरेखा खूपच भिडतात. कादंबरी संपल्यावर वाचक तटस्थपणे प्रत्येक पात्राचा विचार करायला शिकतो. निषिद्ध कप्पा स्वीकारायला खूप हिंमत लागते आणि ती माणूस दाखवू शकत नाही किंवा त्यामुळे परिणामांना तोंड देण्याचे धैर्य त्याच्यात नसते आणि इथेच मुखवटे धारण करून जगणे सुरू होते. 'पुट्टा' तसा नव्हता तर त्याने फरफट होणे स्वीकारले. आयुष्य आणि त्यासोबत येणारी माणसे जशी होती तशीच स्वीकारली. भारतीय मानसिकता ही, स्त्री ने कसे सहन करावे, सतत त्यागशील मूर्ती होऊन राहावे हेच शिकवते. पण 'पुट्टा' कादंबरीत लेखकाने हा संकेत मोडून टाकला आहे. स्त्री स्वतःचा आनंद शोधू शकते, नव्हे तिने तो शोधायलाच हवा आणि तो तिचा हक्क आहे हे ही कादंबरी ठामपणे प्रतिपादित करते. सगळ्या दुभंगलेल्या 'संपी'ना कोणत्या ना कोणत्या रूपात 'पुट्टा' मिळावा !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विक्रम भागवत \u003cbr\u003eप्रकाशक. मिहाना पब्लिकेशन  .\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52828387443010,"sku":"MIHA0066","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/PuttaF.jpg?v=1775021755","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/putta","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}