{"product_id":"rajvansh-bharati","title":"Rajvansh Bharati (राजवंश भारती)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eराजवंश भारती \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e'प्राचीन' हा शब्दही अपुरा वाटावा, इतका प्राचीन इतिहास आपल्या देशाचा आहे. \u003cbr\u003eजगात बहुतेक ठिकाणी जेव्हा लोक रानटी टोळ्या म्हणून रहात होते, त्या काळी \u003cbr\u003eभारतात समृद्ध आणि संपन्न राजघराणी राज्य करीत होती. त्या राजवंशांबद्दल फारच \u003cbr\u003eथोडी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. जी आहे, ती पाश्चात्य अभ्यासकांच्या \u003cbr\u003eओंजळीतून मिळाली तरच स्वीकारायची अशी आपली मनोधारणा जी ब्रिटिशांनी \u003cbr\u003eकरून ठेवली, ती अजूनही संपत नाही. शालेय शिक्षणात या इतिहासाचा अगदी \u003cbr\u003eओझरता भाग शिकवला जातो. मोजके चिकित्सक विद्वान यावर जाडजूड शोधग्रंथ \u003cbr\u003eलिहितात, पण ते इतके क्लिष्ट होतात की आजच्या पिढीतील मुले तसे ग्रंथ हातात \u003cbr\u003eघेतच नाहीत. मग, आमचा देदीप्यमान इतिहास अज्ञानाच्या आणि उपेक्षेच्या \u003cbr\u003eपडद्याआड तसाच दडलेला राहून जातो.\u003cbr\u003eराजवंश भारती या पुस्तकात भारतातील निवडक अशा ५० श्रेष्ठ राजवंशांची थोडक्यात \u003cbr\u003eआणि सचित्र माहिती दिली आहे आणि ती ही शक्य तितक्या सरळ-सोप्या भाषेत दिली \u003cbr\u003eआहे; जेणेकरून अगदी शाळकरी मुलांनाही ती आपलीशी वाटावी.\u003cbr\u003eआपल्या देशाविषयी सार्थ अन् साधार अभिमान नव्या पिढीला वाटावा, एवढाच उद्देश \u003cbr\u003eया पुस्तकाचा आहे ! वन्दे मातरम् !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अॅड. सुशील अत्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55943334428994,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RAJVANSHBHARATIF.jpg?v=1787122396","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/rajvansh-bharati","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}