{"product_id":"ramayan-rahasya","title":"Ramayan Rahasya (रामायण रहस्य)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eरामायण रहस्य \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक काळ असा होता की, स्वतः लेखकच रामायण-महाभारत हे भारताचे प्राचीन ऐतिहासिक ग्रंथ मानीत असे, व तसे सिद्ध करण्याकरिता वैज्ञानिक बुद्धी पणाला लावून लेख लिहीत असे. परंतु त्या काळात लेखकाला योगाभ्यासाची व त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या अतींद्रिय योगानुभवाची जोड नसल्यामुळे रामायण-महाभारतात काही अन्य अध्यात्मिक सत्य असू शकेल, याबद्दल ज्ञान नव्हते. परंपरागत विचारांचा मनावर पगडा असल्यामुळे लेखक तसल्या प्रकारचे लेखन करुन स्वतःला अध्यात्मिकरित्या धन्य मानीत असे. परंतु योग साधना केल्यानंतर या कथांमधील गूढ योगार्थ लक्षात आला. या नवीन दृष्टीकोनातून विचार केल्यास रामायण व महाभारताचे अनन्य स्थान लक्षात घेता वाल्मिकींनी आणि व्यासांनी भारतीय जीवनात किती महत्वाची क्रांती घडवून आणली याची कल्पना येऊ शकेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैदिक परंपरेचे आदर्श जीवन पुन्हा जगण्याकरिता केवळ भारतीयांनीच नव्हे, तर जगातील सर्वच विचारवान लोकांनी रामायण व महाभारतातील आदर्शाचा स्विकार करुन ज्ञानमय वैदिक जीवन सुरु करण्याचा प्रयत्न करणे आता आवश्यक आहे. परंतु त्याकरिता रामायण व महाभारतातील सत्य स्वरुप व आदर्श जाणणे आवश्यक आहे. आजच्या वैज्ञानिक काळात रामायण महाभारतातील कथांमध्ये गुंफलेले योगसाधनेतील अतींद्रिय रहस्य सत्य वैज्ञानिक पद्धतीनेच जगासमोर मांडणे आवश्यक आहे. तसे करताना काही अजाण लोकांच्या मनावर नकळत आघात होत असतील तर त्याला नाईलाज आहे. असल्या भावनाप्रधान लोकांनी आपल्या व्यर्थ अशास्त्रीय भावना दूर सारुन राम कृष्णांचे जगाला आदर्श असलेले जीवन प्रत्यक्ष जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करावा ही कळकळीची विनंती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने लेखकाला जी बुद्धी प्राप्त झाली त्या बुद्धीच्या सहाय्याने असा प्रयत्न लेखक प्रस्तुत पुस्तकाद्वारे करीत आहे. बुद्धिमान व वैदिक परंपरेचे चाहते या महत्प्रयासाला साद देतील अशी आशा आहे. संतयोगी तुकाराम महाराज म्हणतात,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफोडिले भांडार धन्याचा हा माल। मी तो हमाल भारवाही ।। लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eयोगीराज  मनोहर हरकरे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  :  वाल्मिकी  मनोहर  \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : वैदिक प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54956901794114,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RamayanRahsyaF.png?v=1783321999","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ramayan-rahasya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}