{"product_id":"ramchandra-chintaman-dhere","title":"Ramchandra Chintaman Dhere (रामचंद्र चिंतामण ढेरे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eभारतीय साहित्याचे निर्माते \u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eRamchandra Chintaman Dhere (रामचंद्र चिंतामण ढेरे)\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी लोकसंस्कृतीच्या अंगोपांगांचे अनंत आयाम आपल्या परिणत प्रज्ञेने उजळत मराठी मानस आणि समाज यांच्या, प्राचीन काळापासून साकारत आलेल्या उन्नयनाची अवघी प्रक्रिया तिच्या गतिमानतेसह अखिल भारतीय संदर्भात आरेखित करणारे ज्येष्ठ असे प्रतिभाशाली संशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या संशोधनविश्वाचे आलोडन करण्याचा नम्र प्रयत्न या ठिकाणी मांडलेला आहे. 21 जुलै 1930 ते 1 जुलै 2016 असे 86 वर्षांचे जीवन विलक्षण अर्थपूर्ण रीतीने कारणी लावत ढेरे यांनी प्राचीन मराठी वाङ्मय तसेच संस्कृतीच्या प्रांतात संशोधनाचा अक्षरश: गौरीशंकर रचला. प्राचीन मराठी लोकसंस्कृतीचे लोकसाहित्याच्या माध्यमातून प्रगटणारे दर्शन अक्षररूप करणाऱ्या ढेरे यांच्या बहुआयामी विचारविश्वाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करताना, या चरित्रचित्रणात, पुढील सूत्रांची कास धरलेली आहे : (1) ढेरे यांनी विकसित केलेल्या त्यांच्या आगळ्या संशोधन पद्धतीचे काही मुख्य पैलू समजावून घेणे, (2) 'लोकसंस्कृती' या संज्ञा-संकल्पनेची ढेरे यांनी त्यांच्या अभ्यासासाठी अंगीकारलेली व्याख्या जाणून घेणे, (3) आदिम संस्कृती, लोकसंस्कृती आणि नागर संस्कृती या तीन स्तरांदरम्यानचे ढेरे यांनी उलगडलेले नाते आकळणे, (4) लोकसंस्कृती आणि संस्कृती यांच्यादरम्यान नांदणाऱ्या नात्याचा ढेरे यांनी विशद केलेला पोत निरखणे, (5) लोकसाहित्य आणि संतसाहित्य यांदरम्यानच्या अनुबंधाबाबत ढेरे यांनी मांडलेल्या विवेचनाचा परिचय करून घेणे, (6) देवदैवतांच्या श्रद्धाविश्वात रममाण झालेल्या मानवी जाणिवांच्या 'देव' विषयक संकल्पनांच्या उत्क्रांतीचा ढेरे यांनी विश्लेषित केलेला पट न्याहाळणे, आणि, (7) मराठी अध्यात्मविश्वामध्ये विराजमान असलेल्या मुख्य संप्रदायांचा ढेरे यांनी घडविलेला परिचय अनुभवणे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक: अभय घनश्याम टिळक                                                                                                         प्रकाशक: साहित्य अकादेमी\u003c\/strong\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":56012650545474,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ramchandradere-f.jpg?v=1787901386","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ramchandra-chintaman-dhere","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}