{"product_id":"ranajhunjar-senapati-bapu-gokhale","title":"RANAJHUNJAR SENAPATI BAPU GOKHALE  (रणझुंजार सेनापती बापू गोखले)","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eरणझुंजार सेनापती बापू गोखले \u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eअठरावे शतक उलटले आणि मराठा साम्राज्य प्राणसंकटात सापडले. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी अविचाराने इंग्रजांशी केलेल्या वसईच्या तहाने मराठा साम्राज्य इंग्रजांच्या विषारी विळख्यात अडकले. भारतातल्या इतर राज्यांप्रमाणेच मराठा साम्राज्याचा घास इंग्रज घेणार या अशुभाची सावली जाणत्यांना भेडसावू लागली. त्याच वेळी एक वीर पहाडासारखा उभा ठाकला. त्याने आपल्या समशेरीच्या टोकाने तो विषारी विळखा तोडून टाकण्याचा अटोकाट प्रयत्न केला. इंग्रजांना रणांगणात ललकारणारा तो वीर म्हणजे मराठ्यांचे शेवटचे सेनापती बापू गोखले !\u003cbr\u003eशिवछत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्य टिकावे म्हणून बापूंनी आपल्या सर्वस्वाचा होम केला. क्षात्रधर्माची शर्थ करून अखेरीस ते धारातीर्थी पडले. अत्यंत विषम परिस्थितीत हा प्रचंड महापराक्रम करून दाखविलेल्या या शेवटच्या सेनापतीची ही जीवनकहाणी स्नेहलच्या रसिक वाचकांना आवडेल अशी खात्री आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक :अभिजित आंबेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : स्नेहल प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52271997911362,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/RANAJHUNJAR-F.jpg?v=1773230274","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/ranajhunjar-senapati-bapu-gokhale","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}