Akshardhara Book Gallery
Sadetoda Nayak (सडेतोड नायक)
Sadetoda Nayak (सडेतोड नायक)
Share
Couldn't load pickup availability
Author: Raju Nayak
Publisher: Sanjana Publication
Pages: 423
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सडेतोड नायक
समाजाला आरसा दाखवणारा सडेतोड नायक
आपले वास्तव जसे आहे तसे दाखवणारा आरसा प्रत्येक समाजाला हवा असतो. बरे ते दाखवणारा नव्हे, तर खरे आहे ते दाखवणारा. स्वप्नरंजन करणारा नव्हे तर वास्तव मांडणारा. हे समाजाला आरसा दाखवण्याचे काम राजू नायक गेली चाळीस वर्षे सातत्याने करत आहेत. गोव्याची वास्तविक ओळख ते वारंवार करून देत आहेत. ऐकायला आवडेल असे नव्हे न जे ऐकायला हवे ते ऐकवत आहेत. 'तमसो मा ज्योतिर्गमय', समाजाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग ते दाखवतात. या मार्गात त्यांना जे जे तेजोमय आढळले, ते ते त्यांनी मुक्तकंठाने गौरवले आणि जे जे अंधःकाराच्या गर्तेत ढकलणारे दिसले, ते ते कठोर शब्दात निर्भीडपणे मांडले. या असिधारा व्रतोपासनेत त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरलेल्या तप्तकांचन शब्दांनी रत्नजडित झालेले काही लेख या संग्रहात आहेत. जे बरोबर आहे त्याला बरोबर व जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याचे धाडस वाचकांत निर्माण होईल, यात शंका नाही. निर्भेळ शैली, चपखल शब्दयोजना यातून व्यवस्थेवर ठेवलेले नेमके आणि नेटके बोट, ही राजू नायक यांची वैशिष्ट्ये आहेत. गोव्याचा इतिहास, गौरवाचे क्षण, सद्यःस्थिती, निराश करणारे वर्तमान आणि तरीही आशादायक भविष्याची खात्री या लेखनातून मिळते. समाजाला दाखवलेला हा आरसा, प्रत्येकाच्या संग्रही असावा असाच आहे. समाजाचे प्रतिबिंब पाहता यावे यासाठी आणि जमल्यास, सहन झाल्यास स्वतःचेही ! --------पीटर रोनाल्ड डिसोझा, राजकीय भाष्यकार.
लेखक. राजु नायक
प्रकाशक. संजना पब्लिकेशन
