Akshardhara Book Gallery
Sahityatil Mithake ( साहित्यातील मिथके )
Sahityatil Mithake ( साहित्यातील मिथके )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Tukaram Rongate
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 416
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
साहित्यातील मिथके
गेल्या दोनशे वर्षांमध्ये ह्यातील बहुतांश सगळ्या कथा छापल्या गेल्या. ह्या सगळ्यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यापूर्वी ते सगळे मौखिक स्वरूपात वा काही ठिकाणी हस्तलिखित स्वरूपामध्ये या कथा असणार आणि म्हणून आपल्या असे लक्षात येईल की, ह्या ज्या सगळ्या कथा आहेत, त्या अशा संक्रमित होत होत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेल्या आहेत. हे घडत असताना साहजिकच त्यामध्ये सातत्याने भर पडत गेली. म्हणजे लोकसाहित्याच्या संदर्भात आपण जे बोलतो तेच ह्या पुराणकथांच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. त्यामुळे प्रदेशाप्रमाणे आणि काळाप्रमाणे हा बदल झालेला दिसून येतो. एकूण मिथकसृष्टीचा विचार करता हा फार मोठा दस्तऐवज म्हणावा लागेल. अशा मिथकसृष्टीच्या दस्तऐवजाला डॉ. तुकाराम रोंगटे यांनी ग्रंथरूपाने वाचकांसमोर आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे हे काम केले आहे. अभ्यासक आणि संशोधक ह्या ग्रंथाचे नक्की स्वागत करतील. - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
