{"product_id":"saidachya-dozenawari-jindagya","title":"SAIDACHYA DOZENAWARI JINDAGYA  (सईदाच्या डझनावारी जिंदग्या)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSAIDACHYA DOZENAWARI JINDAGYA  (सईदाच्या डझनावारी जिंदग्या)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताच्या अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग एका अदृश्य आणि उपेक्षित श्रमव्यवस्थेच्या पायावर उभा आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे लाखो मजूर, स्थलांतरित कुटुंबे, रोजंदारीवर जगणारे स्त्री-पुरुष, शहरांच्या वेशीपलीकडे वसलेल्या वस्त्यांमध्ये राहणारे कामगार यांच्या अविरत श्रमांमुळे शहरांचे जीवन सुरळीत चालत राहते; पण ते स्वत: मात्र आर्थिक आणि सामाजिक असुरक्षिततेच्या सीमारेषेवर कसाबसा तग धरून आयुष्य कंठत राहतात. प्रस्थापित सामाजिक वास्तवाच्या वळचणीला उभ्या असलेल्या श्रमकरी भारताची अस्वस्थ करणारी, पण मानवी कहाणी म्हणजे नेहा दीक्षित यांचे 'The Many Lives of Syeda'X.\u003cbr\u003eया आर्थिक वास्तवाला धर्म, जात आणि लिंग असे वेगवेगळे शोषक पदर आहेत. धार्मिक द्वेष विस्थापन घडवतो; विस्थापन आर्थिक असुरक्षितता वाढवते; आर्थिक परावलंबित्व पितृसत्तेला अधिक मजबूत करते; या सगळ्यांच्या संधिस्थळी सर्वांत स्वस्त, मूलतः असुरक्षित आणि सहज शोषणसुलभ श्रमिकाचे अस्तित्व आकार घेऊ लागते. ह्या प्रक्रियेकडे लेखिका विचक्षण अभ्यासकाच्या भिंगातून पाहतात. या शोकांतिकेमागच्या आर्थिक रचनेचे आणि संरचनात्मक दिवाळखोरीचे चिकित्सक विश्लेषण करताना त्या कुठेही भावविव्हल होत नाहीत; त्या पाहतात, ऐकतात, नोंदवतात आणि प्रश्न विचारतात. असंख्य मुलाखती, प्रत्यक्ष अनुभव, आकडेवारी आणि तपशील यांच्या आधारे त्या एका स्त्रीच्या आयुष्यातून संपूर्ण व्यवस्थेचा चेहरा उलगडतात. म्हणूनच हे पुस्तक केवळ एका स्त्रीची कहाणी राहत नाही; ते आजच्या भारताचे एक अस्वस्थ करणारे आत्मभान बनते. हे पुस्तक ह्या कालखंडात इतक्या त्वरेने मराठीत येणे हे म्हणूनच स्वागतार्ह आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: नेहा दीक्षित \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवादक: रसिका आगाशे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":68293040013634,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/saidachyadajhanavarijindagya-f.jpg?v=1795239744","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/saidachya-dozenawari-jindagya","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}