{"product_id":"samarangan-sutradhar","title":"SAMARANGAN SUTRADHAR (समरांगण सूत्रधार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमरांगण सूत्रधार\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा समर्थपणे जतन करून आपल्यापर्यंत पोहोचविणारा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे 'समराङ्गगणसूत्रधार'. परमार घराण्यातील ख्यातकीर्त राजा भोजदेव याने इसवी सनाच्या अकराव्या शतकात या ग्रंथाची निर्मिती केली. वास्तुरचना, नगररचना, विविध प्रकारच्या मंदिरस्थापत्य शैली, मूर्तिविधान अशा अनेकविध विषयांचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे. श्री. प्रसाद भगवान सेवेकरी यांनी प्रस्तुत पुस्तकात भोजदेवाच्या या ग्रंथाचा साक्षेपाने परिचय करून दिला आहे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचे भाषांतर इतकेच देण्याऐवजी प्रत्येक विषयाचा त्यांनी सारांश दिला आहे. मात्र हे करताना मूळ ग्रंथातील महितीशी पूर्णपणे प्रामाणिकता राखली गेली आहे. भरपूर छायाचित्रे आणि रेखाकृती दिल्या असल्याने स्थापत्यासारखा सर्वसामान्यांना काहीसा अवघड वाटणार विषयही सुलभतेने समजण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी या सर्वांनाच हे प्रकाशन उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रसाद भगवान सेवेकरी \u003cbr\u003e प्रकाशन : अपरांत प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52846881603906,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SamarangansutradharF.jpg?v=1775389270","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/samarangan-sutradhar","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}