{"product_id":"samkalin-rajkiya-chalval","title":"Samkalin Rajkiya Chalval (समकालीन राजकीय चळवळी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमकालीन राजकीय चळवळी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003eनवहिंदुत्व व जातसंघटना \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमकालीन राजकीय चळवळी : नवहिंदुत्व व जातसंघटना हे पुस्तक तीन विभागांत विभागले आहे. पहिला भाग सोशल इंजिनिअरिंगच्या राजकीय प्रक्रिया व चळवळीवर बेतलेला आहे. नवहिंदुत्व या घटकाच्या आधारे कृतिसज्जता कशी घडली या मुद्द्याचे विश्लेषण केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठा समाजामध्ये काँग्रेसविरोध, सहकार चळवळविरोध, उच्च जातीविरोध, ओबीसी विरोध, अभिजन विरोध असा आर्थिक व राजकीय असंतोष धुमसत आहे, त्यांचेही स्पष्टीकरण केले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनव्वदीनंतरच्या राजकारणाचे जातसंघटना हे एक वैशिष्ट्य ठरते. ओबीसी व दलित समाजातील जात संघटनांचे गेल्या तीन दशकातील केलेले राजकीय दावे, भौतिक हितसंबंधाची स्पर्धा आणि अस्मितांचे राजकारण तसेच गेल्या तीन दशकातील ओबीसी व दलित राजकारणांचे अर्थ स्पष्ट केले आहेत. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनवहिंदुत्व चळवळीतील सत्तासंघर्ष व सत्तासंपादनाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रकल्प व हिंदू राष्ट्रनिर्मितीची चळवळ, जात-संघटनांच्या चळवळीतील इतर मागासवर्ग व अभिजनांमधील सत्तासंघर्षदेखील सविस्तरपणे मांडला आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eनवहिंदुत्व आणि जातसंघटना यांचे राजकीय चळवळ या चौकटीत विश्लेषण करणारे हे पहिलेच पुस्तक आहे. राज्यशास्त्राचे अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार, विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते व समर्थक विरोधक यांना अभ्यासासाठी या पुस्तकातून नवे मुद्दे मिळू शकतील, अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रकाश पवार \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54926796751170,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SAMKALINRAJKIYACHALVALF.png?v=1782545308","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/samkalin-rajkiya-chalval","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}