{"product_id":"sangeet-te-samadhi","title":"Sangeet Te Samadhi (संगीत ते समाधी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंगीत ते समाधी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगानयोगी गानयोगाद्वारे सर्व सिद्धी प्राप्त करु शकतात. या सिद्धी ज्यावेळेस त्यांच्या जड घटनानुसार व्यक्त होतात, त्यावेळेस त्या मानवाला सहजगम्य अशा मनुष्य स्वरुपातच व्यक्त होत असतात; असा दर्शनशास्त्राचा सिद्धांत आहे. तत्वदर्शने मानसशास्त्रीय सिद्धांतांना धरुन होत असल्याने आकाश तत्वापर्यंतच्या सर्व देवता मानव रुपात साकारुन साधकाला साक्षात्कार देत असतात, वर देतात व स्पर्श सुखसुद्धा देतात. मन आहे, तोपर्यंत तत्वदर्शने, देवता साक्षात्काराच्या रुपाने होणारच. मन नाहीसे झाले म्हणजे मग काहीच उरत नाही. असल्या अवस्थेतील साधक निर्विकल्प अवस्थेत असल्याने तेथे दर्शने नाहीत की स्पर्शसुख नाही. ती एक निर्विकार, निर्विकल्प, निरामय, निःस्तब्ध अशी वर्णनापलीकडील अवस्था आहे. त्याचे वर्णन उपनिषदे 'नेति नेति' या शब्दांनी करतात. गीता त्या परम अवस्थेचे वर्णन करते, 'न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।।' ६ अ गीता।। पण जोपर्यंत मन आहे तोपर्यंत मनाच्या संकल्प विकल्पात्मक अवस्थेला मनाला काही दिसलेच पाहिजे, काही भासलेच पाहिजे. त्या मनाला चित्ताच्या एकाग्र चैतन्याची साथ मिळाल्यास मनाचे चैतन्यमय व्यापार देवतारुपाने प्रत्यक्ष साकारतात. हेच देवतांचे साक्षात्कार होत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचित्ताला भिन्न भिन्न अवस्थाभावांतून तृप्त करून त्यांचे उन्नयन करणे व अशा उन्नयनित चित्ताला समाधीच्या दारावर आणून सोडणे हेच भारतीय संगीताचे कार्य होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक  : गानयोगी  मनोहर हरकरे \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : वैदिक प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54956880953666,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SangeetteSamadhiF.png?v=1783321581","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sangeet-te-samadhi","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}