{"product_id":"sant-janabai-shodh-ani-tattvachintan-dhananjay-hanmane-संत-जनाबाई-शोध-आणि-तत्त्वचिंतन","title":"Sant Janabai: Shodh Ani Tattvachintan Dhananjay  Hanmane (संत जनाबाई: शोध आणि तत्त्वचिंतन)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSant Janabai: Shodh Ani Tattvachintan Dhananjay  Hanmane (संत जनाबाई: शोध आणि तत्त्वचिंतन)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंत जनाबाई: शोध आणि तत्त्वचिंतन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरा. धनंजय होनमाने यांचा 'संत जनाबाई : शोध आणि तत्वचिंतन' हा ग्रंथ संत साहित्यातील संशोधनात महत्त्वाची भर घालतो. रा. चि. ढेरे, आ.ह.साळुंखे, वि. भि. कोलते, सुहासिनी इर्लेकर आदि साक्षेपी विचारवंतांचा परामर्श घेत आणि त्याचबरोबर अनेक पारंपरिक वारकरी कीर्तनकारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे सांप्रदायिक दृष्टीकोनाचेही विचार समाविष्ट करून हा अभ्यास संत जनाबाईंच्या व्यक्तिमत्वाचा वेध अनेक अंगांनी घेतो. जनाबाईंसारख्या एका पोरक्या निम्नस्तरातील प्रतिभावंत आणि 'डोईचा पदर खांद्यावरी' घेणाऱ्या स्वाभिमानी स्त्रीची सहाशे वर्षांपूर्वीची अनन्यसाधारण प्रतिभा ह्या ग्रंथात स्पष्ट झाली आहे. 'स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास' हा तिचा उपदेश आजवरच्या जगातील सर्व स्त्री द्रोही काव्यपरंपरांना ललामभूत होऊ शकतो. मराठीतील गाथासप्तशतीपासून आजच्या बहिणाबाईपर्यंतच्या कवयित्रींच्या दोन हजार वर्षांच्या परंपरेत जनाबाईंची थोरवी तिच्या बहुविध आयामांतून व्यक्त होते. पदे, कूट रचना, आख्याने, विराण्या, पाळणा, गौळणी, अंगाई, भारूडे, योग, अध्यात्म, चरित्रे, कथा काव्य, नागार्जुनाचे बौध्द तत्वज्ञान, नामदेवांच्या चौदा जणांच्या कुटूंबाची चाकरी करून एकाकी जगून भक्तिमार्गाच्या वैयक्तिक आराधनेत मुक्ती शोधतांना तिने अशा अनेक स्त्रोतांतून अप्रतिम शैली शोधली. 'खंडेराया तुज करिते नवसू \/ मरू दे रे सासू खंडेराया', अशा आजही नवीन वाटणाऱ्या कविता लिहिणाऱ्या कवयित्रींवरचे प्रस्तुत संशोधन मोलाचे ठरावे. संत जनाबाईंच्या अभ्यासकांना हा उत्तम संदर्भग्रंथ ठरावा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: धनंजय होनमाने \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक:शब्दालाय प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55905428668738,"sku":null,"price":765.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/santjanabai-f.jpg?v=1786535324","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sant-janabai-shodh-ani-tattvachintan-dhananjay-hanmane-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%a8","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}