{"product_id":"sarakari-davakhana-part-2","title":"SARAKARI DAVAKHANA  PART 2\t(सरकारी दवाखाना भाग 2)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSARAKARI DAVAKHANA 2    (सरकारी दवाखाना भाग 2)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\"मला माफ कर...\" नवऱ्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eते ऐकून तिनं नवऱ्याचा थरथरता हात तिच्या थकलेल्या हातात घेतला आणि अलगद आपल्या पोटावर ठेवला. आठ महिन्यांचा उंचवटा अजूनही तसाच होता.....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतिचा हात तिथेच स्थिरावला. तिनं आपल्या थकलेल्या नजरेनं नवऱ्याच्या डोळ्यांत खोलवर पाहिलं. ती काहीतरी सांगू पाहत होती....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनवऱ्यानं पुढे होत तो हात आपल्या हातात घेतला. पोटाच्या उंचवट्यातली हालचाल कधीच थांबली होती.....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक भयाण शांतता त्या वातावरणात पसरली. डॉक्टर, कर्मचारी, सगळेच स्तब्ध उभे होते..... आयसीयूचा श्वास थबकला होता.....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि नवऱ्याच्या तोंडून एकच टाहो बाहेर पडला....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\"आपलं बाळ गेलं गं....\".\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्या एका टाहोने सरकारी दवाखान्याचा आयसीयू थरारला.....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eग्लानी येत असलेल्या बायकोच्या डोळ्यांतून दोन उष्ण थेंब दोन्ही गालांवरून घरंगळले.... तिचे डोळे तसेच उघडे राहिले... अश्रू पूर्ण ओघळण्याआधीच तिचा प्राण निघून गेला होता! फरशीवर बसून बायकोच्या निर्जीव देहाकडे पाहत तो जनावरासारखा ओरडून रडू लागला..... \"आपण काय करून बसलो...\" म्हणून स्वतःच्याच तोंडात मारून घेऊ लागला.....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोण बरोबर? कोण चूक? याला आता काही अर्थ उरला नव्हता... उरला होता तो फक्त पश्चात्ताप! एक भांडण संपलं होतं... फार मोठी किंमत मोजून!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक:  डॉ.प्रकाश सूर्यकांत कोयाडे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67880033321282,"sku":null,"price":396.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sarkaridavakhana-f_d8f89356-e496-4fa8-9fd4-61058f5c5446.jpg?v=1792844551","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sarakari-davakhana-part-2","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}