{"product_id":"sarkhel-kanhoji-angre-maratha-aarmar-सरखेल-कान्होजी-आंग्रे-मराठा-आरमार","title":"Sarkhel Kanhoji Angre.....Maratha Aarmar (सरखेल कान्होजी आंग्रे.....मराठा आरमार)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसरखेल कान्होजी आंग्रे.....मराठा आरमार\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसमुद्रकिनारा असलेल्या देशाची सुरक्षितता व राजकीय स्थैर्य त्यांच्या आरमारावर अवलंबून असते. आरमाराबद्दलची उदासीनता शिवाजी महाराजांनी वेळीच ओळखून नाविक दलाची प्रस्थापना केली. तुकोजीचे पुत्र दर्यावर्दी कान्होजी आंग्रे यांनी मराठा आरमाराची सर्वांगीण वाढ करून पश्चिम किनाऱ्यावर आपला दरारा बसवला. मराठ्यांच्या इतिहासातील कान्होजी आंग्रे यांची दर्यावरील कर्तबगारी सोनेरी पान ठरावे. डॉ. केतकर यांनी 'सरखेल कान्होजी आंग्रे... मराठा आरमार' या पुस्तकाद्वारे मराठी इतिहासातील एका तेजस्वी व रोमांचकारक प्रकरणाला पुन्हा उजाळा दिला आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रेंना केंद्रबिंदू कल्पून शिवशाही ते पेशवेकालीन राजनीती, लष्करी व आरमारी बळाबळ, पोर्तुगीज, इंग्रज व जंजिरेकर सिद्दी यांबरोबरची धोरणे, आरमाराची रचना, विविध प्रकारची गलबते, गुराब, मचवे व जहाजे, तसेच शस्त्रास्त्रे, तोफा, दारुगोळा अशा अनेक संबंधित विषयांची रेखीव नकाशांसह सुसंगत मांडणी दिसून येते. कान्होजींबरोबरच मराठा आरमाराचा उदय व विकास तसेच त्यांच्यानंतर झालेला अपकर्ष या सर्व ऐतिहासिक घटनांची योग्य ती माहिती दिलेली आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर शाहू महाराज सत्तेवर येईपर्यंतचा मराठ्यांचा काळ हा अत्यंत धूसर, चिंताजनक व आणीबाणीचा होता. अशा अस्थिर काळात कान्होजींनी कुलाब्यापासून सावंतवाडीपर्यंत जंजिरेकर सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रजांना वेठीस धरले. अनेक नाविक संघर्षांतून या परकीय सत्तांना आवर घालणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ कामगिरी म्हणावी लागेल. कान्होजींचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू व दमदार होते. उत्तम दर्यावर्दी म्हणून त्यांचा दरारा होता. दुर्दैवाने त्यांच्या वारसांत दुहीचे बीज पेरले गेले व अत्यंत कष्टाने उभारलेल्या मराठी आरमाराची धुळधाण झाली. हा सर्व इतिहास डॉ. केतकरांनी आपल्यासमोर उत्तम रितीने उभा केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. दत्तात्रय रामचंद्र केतकर \u003cbr\u003eप्रकाशक. मर्वेंन टेकनॉलॉजिज्   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51870635491650,"sku":"9788193341285","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SarkhelKanhojiAngreF.jpg?v=1769165178","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sarkhel-kanhoji-angre-maratha-aarmar-%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%96%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}