{"product_id":"sendriya-parasabag","title":"SENDRIYA PARASABAG\t (सेंद्रिय परसबाग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSENDRIYA PARASABAG     (सेंद्रिय परसबाग)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआम्ही पंचवीस वर्षांपूर्वी हौसेने परसबाग करण्यास सुरुवात केली. आम्ही रासायनिक औषधे व रासायनिक कीटकनाशके यांचा वापर टाळून त्या ऐवजी सेंद्रिय खते व कीटकनाशके यांचा कटाक्षाने उपयोग केला. ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्याची बचत केली. परसबागेचे सुशोभिकरण आणि सेंद्रिय भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित केले. गच्चीवरच्या भाजीपाला लागवडीकरिता वाफे तयार करण्याचे तंत्र आम्ही अवगत केले. नवनवीन प्रयोग, अनुभव आणि सातत्य यातून आम्ही शिकत गेलो. घरगुती कचऱ्याचे खतात रूपांतर केल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न संपुष्टात आला. सेंद्रिय भाजीपाला लागवडीला या खताची जोड मिळाली. त्यामुळे घरची ताजी व रासायनिक खतांचे अंश विरहित फळे व भाजीपाला मिळू लागला. परसबागेकरीता महागडी रासायनिक खते वा औषधे वापरण्याची खरोखरच जरूरी नाही असेही लक्षात आले. या परसबागेच्या प्रेमामुळे आम्ही निसर्गाच्या अधिक जवळ गेलो व निसर्गाने भरभरून दिलेल्या आनंदाने आम्ही समृद्ध झालो. स्वानुभव, निरीक्षण, सातत्य यातून जो सेंद्रिय परसबागेचा आनंद आम्ही घेतला, परसबागेचे जे तंत्र व मंत्र आम्हाला समजले, ते दुसऱ्यांना सांगावे यासाठी हा लेखन प्रपंच! हा आमच्या अनुभवाचा खजिना हौशी परसबाग प्रेमींना मार्गदर्शक ठरेल व नव्याने परसबाग करू इच्छिणारे, छोट्याशा बाल्कनीत मोजक्या कुंड्यात झाडे लावणारे, गच्चीवर बाग फुलविण्याचे स्वप्न बाळगणारे आणि फार्महाऊसवर बाग फुलवणारे या सर्वांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. हौशी परसबाग प्रेमींना सादर!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: सौ. आशा उगांवकर, श्री. दिगंबर उगांवकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67796599767362,"sku":"32584","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/sendriyaparasbag-f.jpg?v=1792324591","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sendriya-parasabag","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}