{"product_id":"shabdanchya-alyad-palyad","title":"Shabdanchya Alyad Palyad (शब्दांच्या अल्याड पल्याड)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशब्दांच्या अल्याड पल्याड \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eअनुजा जोशी या गांभीर्याने कविता लेखन करणाऱ्या कवयित्री आहेत. तद्वतच साहित्य समीक्षेच्या क्षेत्रातही मोजकी पण मौलिक कामगिरी त्यांनी केली आहे. 'शब्दांच्या अल्याड पल्याड' संग्रहातील छोटे-छोटे वेल्हाळ लेख वाचताना आपण रमून जातो. पेशी सारखे एकेक शब्द एकत्र आले नि भाषेची निर्मिती झाली. या भाषेचे वस्त्र परिधान करून भावना-विचार प्रकट झाले. त्यातून वाङ्मयाकडे लेखिका अथांग निळा शब्द प्रवाह म्हणून पाहते, तेव्हा निळ्या शाईचा साहित्यप्रवाह तयार होतो. या अविरत झुळझुळ वाहणाऱ्या साहित्य नदीच्या अल्याड-पल्याडचा प्रदेश हे या लेखनाचे आशयसूत्र आहे. लोभस हिरवाईच्या प्रेमात असल्याशिवाय झाडांचे विभ्रम उलगडता येत नाहीत. तद्वतच वाङ्मयावर असलेल्या निखळ प्रेमाला बहुश्रुततेची जोड असल्याशिवाय साहित्याला एवढ्या सहज गुणगुणता येत नाही. प्रतिमा, रुपक, मिथके, लय, मुक्तछंद अशा संकल्पना असू देत नाही तर महाकाव्यापासून गीतीकाव्यापर्यंतचा प्रवास असू दे, या लेखनात त्यांची लीलया मांडणी केली आहे. चपखल दृष्टांत दाखले असल्यामुळे वाचनीयता वाढते. वाङ्मय व्यवहारातील कितीतरी क्लिष्ट संकल्पना सहज सोप्या पद्धतीने मांडताना दिलेली लालित्याची झालर हे या लेखनाचे विशेष आहे. त्यामुळे हे 'लिहितं तारू' वाचकांच्या मनावर हिंदकळताना मनोहारी सफर घडवते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e     - दासू वैद्य\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : अनुजा जोशी \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : अक्षरधन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54951236370754,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shabdanchyaalyadpalyadF.png?v=1783148672","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shabdanchya-alyad-palyad","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}