{"product_id":"shabdanmadhun-kranti-ghadavnara-lokshahir","title":"Shabdanmadhun Kranti Ghadavnara Lokshahir (शब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशब्दांमधून क्रांती घडवणारा लोकशाहीर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकेवळ दीड दिवस शाळेत जाणाऱ्या अण्णांना त्याकाळी शिक्षणासाठी इथल्या मुर्दाड समाज व्यवस्थेनं हिडीसफिडीस केलं होतं! मात्र हार न मानता समोर आलेल्या संकटांचा सामना करत त्यांनी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन जीवघेणा संघर्ष केला आणि परिस्थितीवर मात केली. मग अंतर्मनाचा ठाव घेणाऱ्या कथा, हृदय पिळवटून काढणाऱ्या गीत रचना, खोल विचार करायला भाग पाडणाऱ्या कादंबऱ्या एवढं विपुल साहित्य लिहिलं. तरीही शेवटी विवंचना, उपेक्षा, हेटाळणी, अवहेलना इत्यादी गोष्टींचा आयुष्यभर सामना करत अण्णा उपेक्षित जीवनच जगत राहिले! नाही म्हणायला त्यांना सोव्हिएत रशियातून निमंत्रण आल्यामुळे तिथं तरी त्यांच्या साहित्याचा यथायोग्य सन्मान झाला... त्यांचा सत्कार वगैरे झाला ! त्याकाळात अण्णा भाऊ यांचं साहित्य हे परिवर्तनाला दिशा आणि चालना देणारं ठरलं. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात साहित्याचं योगदान हे महत्त्वपूर्ण मानलं जातं मात्र तरीही दुर्दैवाने अण्णा भाऊंना इतर साहित्यिकांप्रमाणे यथोचित मानसन्मान मिळू शकला नाही! अण्णा भाऊंच्या या काळजाचा ठाव घेणाऱ्या चरित्र कादंबरीमध्ये त्यांच्या संघर्षमय आयुष्यातील अंतर्मुख करणारे अनेक प्रसंग तसेच विचार करायला लावणाऱ्या घटना मांडल्या आहेत. त्यामुळे दर्दी वाचक या कादंबरीचं नक्की स्वागत करणार असा विश्वास वाटतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विनोद श्रा. पंचभाई \u003cbr\u003eप्रकाशक. दुर्वा एजन्सीज  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52831779225922,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShabdanmadhunKrantiGhadavnaraLokshahirF.jpg?v=1775116122","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shabdanmadhun-kranti-ghadavnara-lokshahir","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}