{"product_id":"shaktipithanchi-divya-yatra","title":"Shaktipithanchi Divya Yatra (शक्तीपीठांची दिव्य यात्रा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eशक्तीपीठांची दिव्य यात्रा \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e।। चालविसी हाती धरोनिया ।।\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e५१ शक्तीपीठांचे दर्शन व पर्यटन मार्गदर्शन भाग - १ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'आसेतू हिमालयापासून सिंधूसागरापर्यंत' ठायी ठायी वसलेल्या शक्तीपीठ मंदिरांना त्यांच्या दैवी महात्म्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवी सतीच्या त्यागातून आणि भगवान शिवांच्या विरहातून उदयास आलेल्या या पवित्र शक्तीपीठांची कथा म्हणजे अध्यात्म, पुराणपरंपरा आणि श्रद्धेचा अद्भुत वारसा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशक्तीपीठे अस्तित्वात कशी आली? ती नेमकी किती आहेत? भारतभूमीसह विविध देशात ती कुठे वसलेली आहेत? प्रत्येक शक्तीपीठाची पौराणिक कथा, तेथील देवी तसेच भैरवाचे महत्त्व, धार्मिक परंपरा, पूजाविधी आणि दर्शनाचे अध्यात्मिक महत्त्व काय आहे ? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eया सर्व प्रश्नांची माहिती देतानाच हे पुस्तक वाचकाला प्रत्यक्ष यात्रेचीही दिशा दाखवते. कोणत्या शक्तीपीठापर्यंत केव्हा आणि कसे पोहोचावे, प्रवासाची साधने, निवास व भोजनाची व्यवस्था, आसपासची पर्यटन स्थळे आणि त्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण खानपान व खरेदीची खासियत कोणती, याची उपयुक्त माहिती या पुस्तकातून मिळते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eम्हणूनच 'शक्तीपीठांची दिव्य यात्रा' हे केवळ शक्तीपीठांची माहिती देणारे पुस्तक नाही तर ती आहे पुराणकथांपासून प्रत्यक्ष यात्रेपर्यंत घेऊन जाणारी आणि श्रद्धा, संस्कृती, इतिहास आणि पर्यटन यांना जोडणारी एक दिव्य वाटचाल !\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचला... \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर मग आदिशक्तीच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या शक्तीपीठांकडे पुराणांच्या पाऊलखुणा शोधत श्रद्धेच्या वाटेवरून एक दिव्य यात्रा करूया.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रशांत प्रल्हाद पोकळे \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67711166906690,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHAKTIPITHF.jpg?v=1791801085","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shaktipithanchi-divya-yatra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}