{"product_id":"sheti-samruddhichi-vin-krushipatrakarita","title":"Sheti Samruddhichi Vin Krushipatrakarita (शेती समृद्धीची वीण कृषिपत्रकारिता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSheti Samruddhichi Vin Krushipatrakarita (शेती समृद्धीची वीण कृषिपत्रकारिता)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. मुकुंदराव गायकवाड या माझ्या शेतीनिष्ठ मित्राचं हे पुस्तक. भारतीय शेती अधिक समृद्ध कशी करता येईल, या ध्यासापोटी लिहीलेलं. डॉ. गायकवाड हे स्वतः एका शेतकरी कुटुंबात जन्माला आले आहेत आणि या कुटुंबाच्या वाट्याला आलेली शेती पारनेरसारख्या महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात आहे. ते केवळ शेतीतज्जच नाहीत, तर ते श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक व गुणवान पत्रकार आहेत, याचा प्रत्यय पुस्तक वाचताना पानापानातून दिसून येतो. एखादे डाळिंब सोलून त्यामधील फक्त तांबडे लाल चवदार गोड दाणेच पाहुण्यांपुढे ठेवावेत तसे डॉ. गायकवाड यांनी फापटपसारा पूर्णपणे टाळून पत्रकारिकतेतील मोजका व महत्त्वाचा भागच आपल्या लेखनात समाविष्ट केला आहे. हे पुस्तक शेतीचे भारतीय जीवनातील स्थान, महत्त्व व उपयुक्तता अधोरेखित करणारे आहे. ग्रामीण जीवनाबद्दल विशेष आस्था असणाऱ्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे. सुशिक्षित ग्रामीण तरुणांनाच नव्हे तर शहरी जीवनात रमलेल्या सुशिक्षित तरुणांना पत्रकारितेकडे वळविण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा.डॉ. मुकुंदराव गायकवाड\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67642320060738,"sku":"MIHA0180","price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shetisamrudhhichivin-f.jpg?v=1791022308","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/sheti-samruddhichi-vin-krushipatrakarita","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}