{"product_id":"shivakosh-artha-shiv-samajun-ghetana","title":"SHIVAKOSH ARTHA SHIV SAMAJUN GHETANA(शिवकोश अर्थात शिव समजून घेताना)","description":"\u003ch3\u003e\u003cstrong\u003eशिवकोश अर्थात शिव समजून घेताना\u003c\/strong\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003eहिंदू देवता मंडलातील काही देवता जसे की विष्णु, शिव, शक्ती, गणेश, इ. प्रामुख्याने पूजल्या जातात. केवळ इतकेच नव्हे तर सामान्य जनमानसात या देवतांप्रती असणारी श्रद्धा ही गेल्या अनेक शतकांत उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेल्याचे दिसून येते. या देवतांच्या समाजामध्ये असणाऱ्या माहात्म्याचा इतिहास अनेक शतकांचा आहे. इतिहासातून असे दिसून येते की या देवतांच्या व त्यांच्या संप्रदायांच्या वृद्धीस पौराणिक कथा, धर्मशास्त्र, काव्य, राजाश्रय, कला, मूर्तीशास्त्र, मंदिर निर्मिती व विशेषतः त्या देवतांच्या चरित्र, कार्य व ऊर्जेचे प्रतिनिधित्व करणारी प्रतीके इत्यादी अनेक घटक कारणीभूत ठरले. या सर्व घटकांचा सारांश रुपाने चिकित्सक दृष्टितून आढावा घेण्याचे कौशल्य श्री. प्रदीप श. म्हैसेकर यांच्याकडे आहे. या विषयाला अनुसरून निर्मिलेल्या ग्रंथ श्रृंखलेतील पहिले पुस्तक 'विष्णु समजून घेताना यानंतर, भारतीय संस्कृतीमधील सर्वात प्रमुख व लोकप्रिय प्रतीक असणाऱ्या शिवलिंग आणि अर्थातच शिव या देवतेविषयी विविधांगी मांडणी असणारा ग्रंथ म्हणजे 'शिवकोश' होय.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : प्रदीप म्हैसेकर \u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eप्रकाशन : नावीन्य प्रकाशन\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51952041656642,"sku":null,"price":585.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shivkosh-f.jpg?v=1770633364","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shivakosh-artha-shiv-samajun-ghetana","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}