{"product_id":"shrimant-nanasaheb-peshave","title":"SHRIMANT NANASAHEB PESHAVE (श्रीमंत नानासाहेब पेशवे )","description":"\u003ch3\u003e\u003cspan\u003eश्रीमंत नानासाहेब पेशवे \u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eरियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांनी लिहिलेलं श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांचं हे चरित्र. वास्तविक रियासतकारांनी मराठी रियासतीच्या सुरुवातीच्या भागात नानासाहेबांचे राज्य कारभार आणि पानिपत प्रकरण असे दोन भाग केले होते; पण ते संबंध घडामोडीसंबंधी असल्याने सरदेसाईंनी नानासाहेबांचं स्वतंत्र असं चरित्र लिहिलं. इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर आणि सरदेसाई यांची नानासाहेबांच्याविषयीची मते परस्पराविरुद्ध होती. असं असलं तरीही सरदेसाईंनी आपल्या या नानासाहेब चरित्रात शेजवलरांना प्रस्तावना लिहायला सांगितली आणि तीही कोणतीही वैचारिक तडजोड न करता. सरदेसाईंच्या या खुलेपणाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. असं हे सरदेसाई लिखित नानासाहेब चरित्र पुन्हा प्रकाशित होत असून, वाचकांना याचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : त्र्यंबक शंकर शेजवलकर\u003cbr\u003eप्रकाशन : कृष्णा पब्लिकेशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51944546435394,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/shrimantnanasahebpeshwe-f.jpg?v=1770379355","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shrimant-nanasaheb-peshave","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}