{"product_id":"shrimant-sarfojiraje-bhosale-tanjavoor","title":"Shrimant Sarfojiraje Bhosale, Tanjavoor (श्रीमंत सर्फोजीराजे भोसले, तंजावर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eश्रीमंत सर्फोजीराजे भोसले, तंजावर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचार शतकांहून अधिक काळ, तंजावर एक अद्वितीय आणि चैतन्यशील मराठी वारसा आहे. तंजावरच्या मराठी राजवंशाचे तेरावे वंशज म्हणून, सरफोजीराजे यांच्या असाधारण वारसाला समर्पित करण्यात आलेले अॅड. विलासजी पाटणे यांचे भराठीतील हे महत्त्वाचे पहिले पुस्तक रसिक वाचकांच्या हाती देताना आनंद होत आहे. हे पुस्तक मराठ्यांच्या तंजावरच्या सुवर्णकाळावर प्रकाश टाकते. मराठ्यांचे तंजावरमध्ये आगमन हे केवळ सत्तेचे हस्तांतरण नव्हे तर तामिळ आणि मराठी परंपरांच्या संमेलनाचे, त्यांच्या एकत्रित संवर्धनाची सुरुवात होती. यामुळे तंजावरची सामाजिक आणि आध्यात्मिक वीण समृद्ध झाली. मराठ्यांच्या काळात, तंजावरमध्ये कलात्मक अभिव्यक्तीचा सुवर्णकाळ होता. मी अॅड. विलास पाटणेजींचे सखोल संशोधन आणि उत्कृष्ट मांडणी यांचे कौतुक करतो. हे पुस्तक केवळ सरफोजीराजांचा सन्मान करत नाही तर दक्षिणेतील विस्तारित मराठा वंशाशी महाराष्ट्राला पुन्हा जोडणारा पूल म्हणूनही काम करते. हे पुस्तक दोन्ही प्रदेशांतील संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देईल. या चरित्रग्रंथाचे लेखक वकील आहेत. त्यांनी सरफोजीराजांचे चरित्राचा साक्षेपी वृत्तीने वेध घेतला आहे. तंजावरच्या मराठा राजवटीतील घडामोडींचा धांडोळा अॅड. पाटणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सुंदर घेतला आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात परस्पर संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे मार्ग मव्याने सुरू होतील. हा प्रेरणादायी ग्रंथ मराठी संस्कृतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करेल, अशी भी आशा व्यक्त करतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. विलास पाटणे \u003cbr\u003eप्रकाशक. बुकमार्क पब्लिकेशन्स   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129854259522,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ShrimantSarfojirajeBhosaleF.jpg?v=1772795823","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/shrimant-sarfojiraje-bhosale-tanjavoor","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}