{"product_id":"solapur-jilhyatil-swatantrya-sainikancha-durlakshit-itihas","title":"Solapur Jilhyatil Swatantrya Sainikancha Durlakshit Itihas (सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा दुर्लक्षित इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eSolapur Jilhyatil Swatantrya Sainikancha Durlakshit Itihas (सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा दुर्लक्षित इतिहास)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसोलापूरचा स्वातंत्र्यलढा भारतीय इतिहासात अद्वितीय आहे. ६ एप्रिल १९३० रोजी सोलापूर महानगरपालिका इमारतीवर भारतीय झेंडा फडकावला गेला. महात्मा गांधींच्या अटकेनंतर उसळलेल्या आंदोलनातून ९ ते १२ मे १९३० दरम्यान सोलापूरात इंग्रजी अधिकारी पळून गेले, यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधीच सोलापूरकरांनी चार दिवस स्वातंत्र्य अनुभवले. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रिटिशांनी १२ मे १९३० रोजी शहरात ‘मार्शल लॉ’ लागू केला. हा कायदा लागू झालेले सोलापूर हे ब्रिटिशकालीन भारतातील एकमेव शहर होते. आंदोलन दडपताना ब्रिटिशांनी गोळीबार केला. यामध्ये अनेक निरपराध लोक मृत्यूमुखी पडले. त्यानंतर मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या चार क्रांतिकारकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आली. हा गौरवशाली इतिहास सर्वांनी वाचावा व त्यातून देशप्रेमाची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: प्रा.डॉ.शिवाजी म्हस्के \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67695917531458,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/solapurjilhyatil-f.jpg?v=1791532111","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/solapur-jilhyatil-swatantrya-sainikancha-durlakshit-itihas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}