{"product_id":"srujanstrot","title":"Srujanstrot (सृजनस्रोत)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसृजनस्रोत\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रसिद्ध 'डिक्शनरी जॉन्सन', म्हणजे अठराव्या शतकातील इंग्लिश कोशकार डॉ. जॉन्सन यांचे चरित्रकार जेम्स बॉस्वेल हे नुकतेच कोर्सिका प्रांताचा दौरा करून आले होते. गप्पा मारताना ते जॉन्सनला म्हणाले, \"या दौऱ्याची हकीगत लिहायचा माझा इरादा आहे.\" तेव्हा डॉ. जॉन्सन उद्गारले, \"तुला जमतील तितक्या दंतकथा आम्हाला दे!\" (\"Give us as many anecdotes as you can.\") लेखक आणि लेखन यांविषयीच्या साहित्यिक दंतकथा (literary anecdotes) जगातल्या सर्वच भाषांमध्ये उपलब्ध असतात. परंतु त्या प्रयत्नपूर्वक शोधून, जमवून, नोंदवून ग्रंथगत करण्याची पद्धत मराठीत फारशी रुजलेली दिसत नाही. इंग्रजी भाषेचे मात्र तसे नाही. तिथला सर्व व्यवहार खुलाखुला असतो. त्यामुळे तिथल्या साहित्यिक विश्वातले असे किस्से, दंतकथा, यांचे संग्रह उपलब्ध आहेत. अनेक संबंधितांनी ते वेळोवेळी नोंदवूनही ठेवलेले दिसतात. त्यामुळे एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वावर, साहित्यप्रकारावर वेगळा प्रकाश पडू शकतो; काही घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते; एखाद्या कलावस्तूच्या निर्मितीमागची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रेरणा समजू शकते. निखळ मनोरंजन तर होतेच. अशा काही रंजक आणि 'प्रेरक' हकिकतींचा कवितांच्या मागे दडलेला स्रोत शोधण्याचा हा एक प्रयत्न. मात्र हे लेखन किस्से-कहाण्यांच्या रंजक वरपांगी वाटेने न जाता रसग्रहण, विश्लेषण, समीक्षण, अर्थनिर्णयन या वाटा देखील शोधते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. शिरीष चिंधडे \u003cbr\u003eप्रकाशक वर्णमुद्रा पब्लिशर्स \u003cbr\u003e   \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52914274664770,"sku":"VARN0006","price":381.6,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SrujanstrotF.jpg?v=1775903565","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/srujanstrot","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}