{"product_id":"stri-chalval-nabad-pannas","title":"Stri Chalval Nabad Pannas (स्त्री चळवळ नाबाद पन्नास !)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eस्त्री चळवळ नाबाद पन्नास !\u003cbr\u003eस्त्रियांच्या संघर्ष आणि यशाची गजब कहाणी... \u003cbr\u003eखंड - १ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eविद्या बाळ अध्यासन प्रकल्प दोन अंतर्गत निर्मित\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआंतरराष्ट्रीय महिला वर्षाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल, स्त्री चळवळीचा ५० वर्षांचा प्रवास हा एकरेषीय एकजीव पद्धतीने न पाहता त्याचं बहुपदरी, बहुढंगी रुप उजागर करणं ही किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 'स्त्री चळवळ नाबाद पन्नास!' हेउलगडतं. हे पुस्तक एखाद्या होल्डऑलसारखं आहे, अनेक शैलींच्या, विविध विषयांवरच्या लेखांना सामावून घेणारं. यामध्ये स्त्रियांच्या अदृष्यतेचे राजकारण, पुरुष प्रश्न, सांप्रदायिकता यापासून ते तंत्रज्ञान \/AI, अशा त्यामानाने कमी अभ्यासलेल्या विषयांवरचे लेख, काही लेखमाला आहेत. विशेष कर्तृत्ववान स्त्रियांबद्दल, आंदोलनांबद्दल माहिती आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतील, अगदी तळकोकणापासून गडचिरोलीपर्यंतच्या गाव-शहरातील स्त्रियांचे, त्यांच्या जगण्याबद्दलचे लेख आहेत. स्त्रीवाद आणि त्याच्याशी जोडली गेलेली विविध अभ्यासक्षेत्रं, विचारप्रवाह यांच्या गेल्या पाच दशकांच्या बदलत्या नात्याचा कालक्रमगत वेध आहे. स्त्रियांच्या समकालीन प्रश्नांचे विश्लेषण आहे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं स्त्रीवादाबद्दलचं चिंतन आहे. ग्रामीण भवतालातील स्त्रियांपासून, पुरुषांच्या नजरेतून दिसणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवांचा, पितृसत्तेच्या, जातीच्या, सामाजिक सत्तेच्या बहुव्यापी अनुभवांचा आणि त्यातून येणाऱ्या ग्रासरुटस् फेमिनिझमचा हा धांडोळा आहे. स्त्री चळवळीच्या प्रवाहामध्ये आणि प्रवाहाबाहेर राहिलेल्या स्त्रियांच्या व्यक्तिगत आणि सामूहिक संघर्षाच्या, जागतिक ते स्थानिक, ऐतिहासिक ते समकालीन अशा कहाण्या यात आहेत. स्त्रिया या गटाच्या परिघावर राहणाऱ्या सिंगल स्त्रिया, ट्रान्सस्त्रिया यांच्या नजरेतून दिसणाऱ्या स्त्रीवादाची मांडणी पण आहे. स्त्रीकेंद्री अनुभव आधारित लिखाण आहे, तसेच लिंगभाव दृष्टिकोनातून सैद्धांतिक लिखाणही आहे. फुले-आंबेडकरी, दलित बहुजन स्त्रीवादी विचारांचा वारसा, त्यातून स्त्री चळवळीवर केलेले परखड भाष्य आहे. स्त्री चळवळीचा, तिच्या भगिनीभावाचा लेखाजोखा आहे. स्त्री चळवळीच्या प्रवासाचं मला वाटलेलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची स्व-निरीक्षण करण्याची इच्छा, विमर्शात्मकता, अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची क्षमता, स्वतःच्या घडणीला अवघड प्रश्न विचारण्याची ताकद. याची साक्ष या पुस्तकाच्या बहुस्पर्शी रुपात आहे. वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या वेगवेगळ्या पिढीच्या, विचाराच्या, छोट्या-मोठ्या स्त्रीवादी कार्यकर्त्या-अभ्यासकांच्या स्त्री प्रश्नाबद्दलच्या मांडणीचा हा विस्तृत संमिश्र पट आहे. थोडक्यात स्त्री प्रश्न जाणू पाहणाऱ्या वेगवेगळ्या रुचीच्या माणसांना काही ना काही भावेल, असे हे पुस्तक आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eअनघा तांबे \u003cbr\u003eस्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागप्रमुख \u003cbr\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंपादक : डॉ. गीताली वि. मं. \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54991359672642,"sku":null,"price":1800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/SHTRICHALVALF.jpg?v=1784208843","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/stri-chalval-nabad-pannas","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}