Akshardhara Book Gallery
Swarchandrika ( स्वरचंद्रिका )
Swarchandrika ( स्वरचंद्रिका )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Sangeeta Godbole
Publisher: Chaparak Prakashan
Pages: 328
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
स्वरचंद्रिका : पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर
एक माणूस, एक कन्या, एक शिष्या, एक पत्नी, एक कुटुंबवत्सल आई, आणि रसिकांशी सहज संवाद साधणारी बोलकी व्यक्ती म्हणूनही पद्मजाताईंचे दर्शन या ग्रंथातून घडते, जे खरोखरच महत्त्वाचे आणि मौलिक आहे. या गौरवग्रंथात कुणी-कुणी लिहिले आहे? भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी काय म्हटले आहे? किंवा माजी पंतप्रधान, भारतरत्न कविवर्य अटलबिहारी वाजपेयींचा आशीर्वाद कसा लाभला? विदुषी लेखिका दुर्गाबाई भागवत, आपले लाडके पु. ल. देशपांडे (भाईकाका), कविवर्य ग्रेस, शंकर रामाणी आणि इतर अनेक लेखक-कवींनी काय लिहिले आहे? संगीत क्षेत्रातील पं. जसराजजी, पं. रामनारायणजी, पं. हृदयनाथ मंगेशकर यांसारख्या गुरूंबरोबरच इतर नामवंत व्यक्तींनी काय लिहिलंय? विविध राजकीय व्यक्ती, शास्त्रज्ञ, उद्योगपती, आयोजक यांचे कोणते अभिप्राय आहेत, किंवा प्रसिद्ध साऊंड इंजिनियर अविनाशजी ओक, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, श्रीमती शिरीष पै, नौशादजी यांनी कोणते गौरवोद्गार काढले, हे मी इथे सांगणार नाही. हे सर्व आपण या सचित्र ग्रंथाच्या पानोपानी वाचणारच आहात!
प्रकाशक : चपराक प्रकाशन
