Akshardhara Book Gallery
Tambus Dhuka Aani Niala-Paani (तांबूस धुकं आणि निळं पाणी)
Tambus Dhuka Aani Niala-Paani (तांबूस धुकं आणि निळं पाणी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Mahavir Jondhale
Publisher: Manovikas Prakashan
Pages: 272
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator: -----
तांबूस धुकं आणि निळं पाणी
प्रवास म्हणजे केवळ आनंदसोहळा नसून, तो ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
समजून-उमजून जग पाहण्यासाठी केलेली ही भटकंती आहे. त्यातूनच अलीकडच्या
काळात जर्मनी, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल आणि अर्धी-अधिक अमेरिका फिरण्याचा
योग आला. फिरताना अनुभवांचे आणि मनातील भावनांचे स्वरूप वेगवेगळे होते.
कधी वाहक बनून सौंदर्यभावना रूपनिष्ठ होत गेली. आयुष्याच्या वाटचालीत
ओंजळीत भरून घेऊन वाटत राहावे असे जे काही मनात साठले, ते शब्दरूपाने
वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. संस्कार आणि परंपरेबरोबरच मानवावर
झालेले आघात, त्यामागील मानसिकता, विकासाची दिशा आणि नागरिकशास्त्र यांचाही
अभ्यास वेळोवेळी करता आला. ज्या काळात जे निर्माण झाले, त्यामागील वास्तव
समजून घेण्याचा एक भाग म्हणूनही या भटकंतीकडे पाहता येईल.
विविधता ही केवळ वरवरची नसून ती आतून कशा पद्धतीने जपली गेली आहे,
हे समजून घेण्यासाठी नागरिकांचे बहुरंगी जीवन अभ्यासता आले. जीवनावर
उदंड प्रेम करणारी माणसे नरसंहारातून कशी बाहेर पडतात, हेही अग्रक्रमाने
पाहता आले.
हृदयीचा जिव्हाळा वास्तूंच्या रूपात ओतताना निसर्गाला हात न लावता त्यांनी
केलेली पुनरुभारणी म्हणजे मौलिकता काय असते, याचे उत्तर आहे. वास्तव
जतन करण्याची त्यांची जबरदस्त भावना पदोपदी जाणवते. ज्ञानलालसा,
विवेक आणि तर्क यांच्या आधाराने अन्वयार्थ लावण्यासाठी ही निरीक्षणे
उपयुक्त ठरतात.
विविध क्षेत्रांतील संशोधनासाठी उभारलेल्या संस्था मोक्याच्या वळणांवरही
जतन करून ठेवण्याची परंपरा ही त्यांची विशेष ओळख आहे. दिसले ते सारे
आकाश मेंदूत साठवून वाचकांसमोर मुक्त केले आहे.
जे काही उरलेसुरले असेल, ते पुढच्या खेपेला तुमच्यासमोर येईल.
नजरेपासून लपून राहिलेलेही आपोआप उजागर होईल.
केवळ वाचकांशी संवाद साधावा, या उद्देशाने हा भटकंतीचा आकृतिबंध
विचारनिष्ठ दृष्टिकोनातून, सुसंरचनेत तुमच्यासमोर ठेवत आहे.
लेखक : महावीर जोंधळे
प्रकाशन : मनोविकास
