{"product_id":"teen-dagadanchi-chul-ani-chandra","title":"Teen Dagadanchi Chul ani Chandra (तीन दगडांची चूल आणि चंद्र)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eतीन दगडांची चूल आणि चंद्र \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशब्दांना वाटते,\u003cbr\u003eसापडला आता हा जाळ्यात.\u003cbr\u003eआणि ह्याला खात्रीच,\u003cbr\u003eशब्द तर काय आता\u003cbr\u003eदावणीचं जनावर.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशब्द गाठतात ह्याला एकांतात\u003cbr\u003eभरदिवसा नाहीतर अपरात्री, धरतात गळा.\u003cbr\u003eगुदमरतो जीव ह्याचा... आणि श्वास. हाही बिलंदर !\u003cbr\u003eजनावर सोडतो मोकाट पिकांत, दिसेल त्याच्या. \u003cbr\u003eगाव झोपल्यावर मध्यरात्रीला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजाळे होते घट्ट, अधिक घट्ट... दिसरात्रींचे. \u003cbr\u003eहा तळमळतो. तडफडतो. हाक घालतो मदतीची. \u003cbr\u003eसुनसान चहूओर किनारे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपोट फुगून जनावर येते परत, अपरात्री दावणीशी \u003cbr\u003eझाडते हातपाय... खाल्लेलं दाटून आलं म्हणून.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकविता असणारी कुणी एक म्हातारी, कण्हत असते दिवसरात्र \u003cbr\u003eया खेळात... तुटक्या बाजल्यावर... वर्तमानाच्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : वसंत वाहोकार \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55470842544450,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TINDAGADANCHICHULF.jpg?v=1785416144","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/teen-dagadanchi-chul-ani-chandra","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}