{"product_id":"the-people","title":"THE PEOPLE (जनता)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eDr. BABASAHEB AMBEDKAR SOURCE MATERIAL Vol. 3-5\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eजनता\u003cbr\u003eTHE PEOPLE\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eवर्ष ५ वे | ०८ फेब्रुवारी १९३६ ते ३० जानेवारी १९३७ | अंक १ ते ४९\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन\u003cbr\u003e२०२३\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'मुक्ती कोन पथे?'\u003cbr\u003eया प्रसिध्द भाषणातील काही अंश\u003cbr\u003e(दिनांक ३१ मे १९३६, मुंबई.)\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e       मी माझा निश्चय करुन टाकला आहे. मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे. माझे धर्मांतर कोणत्याहि प्रकारच्या ऐहिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीहि गोष्ट नाही की, अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करुन घेता येणार नाही. माझ्या धर्मांतराच्या मुळाशी अध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीहि भावना नाही.\u003cbr\u003e      या प्रसंगी तुम्हास काय सांगावे, याचा विचार करीत असताना भगवान बुध्दाने आपल्या भिक्षू संघास मरणापूर्वी जो उपदेश केला व ज्याचा 'महापरिनिब्बान सुत्तांत' उल्लेख केलेला आहे त्याची मला आठवण होते एकदा भगवान बुध्द नुकतेच दुखण्यांतून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यास अभिवादन करुन एके बाजूस बसला आणि म्हणाला. \"भगवंतास मी सुखात असतांना पाहिले आहे. भगवताच्या आजाराने माझे १. शरीर शिशासारखे जड झाले आहे. मला दिशाभ्रम झाला आहे. मला धर्मही सुचत नाही, परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की, भिक्षू संघांविषयी काही तरी सांगितल्याशिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हावयाचे नाही.\"\u003cbr\u003e      भगवान बुध्द यांनी उत्तर दिले कीं, \"आनंदा! भिक्षुसंघास मजपासून काय हवे आहे. आनंदा! मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचार्यमुष्टी मुळींच ठेविली नाही. तर मग आनंदा, तथागत भिक्षू संघाविषयी काय सांगणार? तेव्हा आनंदा, तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित | दुसऱ्या कोणाला व्हा! पृथ्वीप्रमाणे पर प्रकाशित होऊ नका! सत्याला धरुन रहा! सत्याचाच आश्रय करा! व शरण जाऊ नका!\"\u003cbr\u003e      मी सुध्दा बुध्दाच्या शब्दाचाच आश्रय करुन तुम्हांला असा निरोप देतो की तुम्हीच आपले आधार व्हा! तुम्हीच स्वतःच्या बुध्दीला शरण जा! दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका! दुसऱ्या कोणालाहि वश होऊं नका ! 'सत्याचा आधार घ्या! सत्यास शरण जा! दुसऱ्या कशासही जाऊ नका!' हा भगवान बुध्दाचा उपदेश तुम्हीं या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही._ • \u003cstrong\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e(संदर्भ :- जनता, वर्ष ५ वे, अंक २०, २७ जून १९३६)\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67740183003458,"sku":"GOVE0035","price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/WhatsApp_Image_2026-10-14_at_18.57.10.jpg?v=1791984493","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-people","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}