{"product_id":"the-woods-are-lovely","title":"The Woods Are Lovely (द वूड्स आर लव्हली)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eद वूड्स आर लव्हली\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसुरेंद्र दरेकरांची कथा कॅज्युअली, जातायेता, वाचायची कथा नाही. ती बसनं जावं का रिक्षा परवडेल? अशी विवंचना पडू शकणाऱ्या मध्यमवर्गाची, त्यांच्या रोजच्या व्यथा, वेदना, आनंद, अपेक्षाभंगांचे दंश, सतत अधिक चांगल्या आयुष्याची असोशी यांची कथा आहेच; पण याहून ती हे सर्व गांभीर्याने, बुद्धीने समजून घेऊ पाहण्याच्या तळमळीची कथा आहे. आपण शिकतोय त्या तत्त्वज्ञान, विविध ज्ञानशाखांमधल्या संकल्पना रोजच्या जगण्याला लावून त्याचा काही उलगडा करण्याच्या बौद्धिक घडपडीची कथा आहे. दरेकर हे निखळ बुद्धीच्या अंगाने; पण संवेदना अजिबात कोरडी न होऊ देता करू पाहतात, अगदी भावनिक पेचही तसेच उलगडू पाहतात. आपण शिकतोय ते अध्यात्मादि तत्त्वज्ञान, त्यातल्या वेगवेगळ्या संकल्पना रोजच्या जगण्याला, अनुभवांना लावून पाहणे, हे त्यांच्या कथेतून अहमहमिकेने येते. हे मराठी साहित्यातले नवे वेगळे वळण म्हणावे लागेल. दरेकर जगण्यातल्या विशुद्धतेचा, निकोपपणाचा व्यासंगी पण पूर्वग्रहमुक्त, अनाग्रही शोध घेऊ पाहतात. कथात्म साहित्य अधिकाधिक रंजनाच्या आहारी जात असताना दिसलेली ही वाट वाचकाश्रयाने जपायला हवी, तिचा विकास मराठी साहित्याभिरूचीला समृद्ध करेल असे वाटते. -----नीतिन वैद्य\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुरेंद्र दरेकर \u003cbr\u003eप्रकाशक. सृजनसंवाद प्रकाशन  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":51973925536066,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/TheWoodsAreLovelyF.jpg?v=1771064645","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/the-woods-are-lovely","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}