{"product_id":"thrills","title":"Thrills (थ्रील्स)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eथ्रील्स\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमृत्यूच्या सावलीत सतत वावरणारी माणसं मृत्यूस घाबरत नसली, तरी त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा-वेदना-दुःख, काळजाला पीळ पाडते. या सर्व कथांमधील मानसिक क्रौर्य, अज्ञान, दारिद्र्य-दैन्य-हव्यास, अन्यायाविरोधात उठवलेला आवाज, असं संमिश्र चित्रण वाचकाला सतत कातर करते व उत्सुकता वाढवते. माणसं काही वेळा नियतीच्या चक्रात अडकतात, किंवा कोणीतरी त्यांना दुष्कर्मे करण्यास भाग पाडते. या कथा जीवनानुभव, जीवनसंघर्ष नाट्यमयरीत्या उलगडून दाखवतात. या अज्ञानी जीवांचा अधांतरी, पाशवी, अंधारा प्रवास म्हणजे माणसाचे जिणे नव्हे, हे वाचकांना 'ब्रिल्स' मधून पटते. 'माधोसिंह'सारखा हुशार व तरुण शिक्षक एकाएकी चोऱ्या व गुन्हेगारी करू लागतो... का? 'रहस्य' कथेतील रहस्य, वकील व वाचकांनाही थक्क करते. अशील-मिसेस नीला देशपांडेचे अजब कोडे अखेर सुटते का? गुन्हेगारी मानसिकता अधोरेखित करणारा कथासंग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. महादेव मोरे \u003cbr\u003eप्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस  \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52103936213314,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/ThrillsF.jpg?v=1772175985","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/thrills","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}