Akshardhara Book Gallery
Tiriya (तिरिया)
Tiriya (तिरिया)
Share
Couldn't load pickup availability
Author: Milind shinde
Publisher: Maitri Publication
Pages: 69
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Tiriya (तिरिया)
तिरिया
माणूस शरिराची नग्नता झाकण्यासाठी हरतऱ्हेचे कपडे परिधान करत असतो. तसेच मनावरही संस्कृतीच्या दबावाचे तथा सभ्यतेचे कपडे चढवत असतो. मात्र कविता सत्य बोलते. बऱ्याचदा कवी व्यवस्थेच्या दबावातून तिला प्रतिमा-प्रतिकांच्या सात्विक सोज्वळ कपड्यात गुंडाळून समोर ठेवतो. तिला खरी कविता कशी म्हणणार? कवी मिलिंद शिंदे यांच्यातल्या कवीत खऱ्या कवितेसाठी किंमत मोजण्याची धमक आहे. कवितेच्या मूळ ताकदीचा वापर करत स्त्रीत्वाची भावना त्यांनी बिनधास्तपणे समोर ठेवली आहे. या कवितांमधून हजारो स्त्रियांचे म्हणणे तुकड्यातुकड्यातून व्यक्त झाले आहे. म्हणूनच ही कविता कोण्या एका स्त्रीची राहत नाही. परकाया प्रवेश करत मिलिंद शिंदे व्यक्त होतात, त्याने आपण स्तिमित होतो. ही भावना पुरुष कसा काय मांडू शकतो ? सभ्यतेचे सर्व बुरखे टराटरा फाडून पुरुषाला खुलेआम नागवे करणारी, त्याच्या लैंगिक वासनेचा धज्जा उडवणारी, स्त्रीत्वाची टेरिफिक भावना कवितेच्या संदर्भात पहिल्यांदा वाचली. स्त्रीत्वाच्या भावनेवर झालेल्या अन्यायाचा नव्हे बलात्काराच्या विरोधातला हा विद्रोह आहे. स्त्रीच्या कातडीत आरपार रुतलेली पुरुषाची वासनांध नजर अशी काही उलगडून दाखवली आहे की पुन्हा पुरुषाच्याच इज्जतीचा नक्षा पुरेपूर उतरवून ठेवला आहे.
लेखक: मिलिंद शिंदे
प्रकाशक: मैत्री पब्लिकेशन
