Akshardhara Book Gallery
To Parat Aala (तो परत आला)
To Parat Aala (तो परत आला)
Share
Couldn't load pickup availability
Author: Raviraj
Publisher: Shashvat Media
Pages: 263
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तो परत आला
'तो परत आला' या पुस्तकात आपल्याला १२ गूढ व भीतीने अंगावर काटा आणणाऱ्या कथा वाचनासाठी मिळणार आहेत. या कथा आपल्याला भय, अनामिकतेची जाणीव आणि अंधारात लपलेल्या रहस्यांची थोडक्यात ओळख करून देतील.
Author. Raviraj
Publication. Shashvat Media

📖 तो परत आला – पुस्तक समीक्षा "तो परत आला" हे रविराज यांचं नवीन पुस्तक नुकतंच वाचलं. एकदम १२ भन्नाट कथा आहेत यात! विशेष म्हणजे या सगळ्या फक्त भीतीदायकच नाहीत तर १–२ कथा थोड्या emotional आहेत, अगदी प्रेमळ भुतांच्याही आहेत ❤️👻. हे वैशिष्ट्य खूप वेगळं आणि लक्षात राहणारं वाटलं. साधारणपणे भुतांच्या कथांमध्ये शेवटी चांगल्या शक्तीचा वाईटावर विजय दाखवला जातो, पण इथे तसं नेहमी घडत नाही. काही ठिकाणी वाईट शक्ती परत कशा जागृत होतात, हे वाचून अंगावर काटा आला. त्यामुळे पुढच्या भागासाठी लेखकाने छान scope ठेवला आहे, असं वाटतं. आणखी एक छान गोष्ट म्हणजे – प्रत्येक आत्मा वाईटच असतो असं नाही. काही आत्म्यांचं वर्तन त्यांच्या अतृप्त इच्छांनुसार होतं, असं जाणवतं. त्यामुळे कथांना एक वेगळाच थरार मिळतो. कथा वाचताना मन आपोआप चित्र रेखाटू लागतं आणि आपण काहीतरी ठराविक अपेक्षेने वाचत जातो. पण लेखकाने प्रत्येक ठिकाणी असे twists दिले आहेत की अक्षरशः प्रत्येक पानावर “अरेच्चा! याचा विचारच केला नव्हता!” असं वाटत राहतं. त्यामुळे उत्कंठा सतत वाढत राहते आणि कथा हातातून सुटत नाही. paper quality आणि font मस्त आहे. आणि कथेसोबत दिलेली छायाचित्रं तर खरीच अंगावर येतात 😨. वाचताना जणू आपणच त्या वातावरणात असल्यासारखं वाटतं. रविराजचं "नंदनवन" हे पुस्तक आधी वाचलं होतं, .त्यामूळेच या दुसऱ्या पुस्तकाबद्दल उत्सुकता होती आणि लगेच विकत घेतलं . नंदनवन बद्दल पुन्हा केव्हातरी लिहीन . 👉 भुतांच्या कथा फक्त घाबरवतात असं नाही, त्या मनालाही स्पर्श करू शकतात – याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘तो परत आला’.