{"product_id":"tuka-zala-pandurang","title":"Tuka Zala Pandurang (तुका झाला पांडुरंग)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eTuka Zala Pandurang (तुका झाला पांडुरंग)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'मला अवघ्यांचा विसर पडतो आणि श्रीरंगाचेच वेध लागतात. मग सगळं सोडून त्याच्याकडेच जावंस वाटतं आणि मी उठून चालायला लागतो. पाय नेतील तिकडे जायला लागतो. पण पायांना काही अजून वैकुंठाची वाट गवसत नाही. तरी पांडुरंगाचा कधी कंटाळा येत नाही. आता मला कशाचंच भय वाटत नाही. वैकुंठाचं बोलावणं येईल की नाही याचीही चिंता वाटत नाही. कारण आता सारी सुखं पायाशी लोळण घेतात. इतके कष्ट घेतले पण जे सुख मिळालंय ते अवीट आहे. आता मी इतका बलवान झालोय की साऱ्या जगावर सत्ता चालवू शकेन. मनानं नि स्वभावानं प्रेमडोहात बुडी मारलीय. आता देहभाव काही उरलेच नाहीत... माझ्या संसाराचा फजिता उडाला. पण मला केवढा आनंद मिळाला! किती सुख मिळालं! माझ्या भक्तीचं फळ मिळालं... पांडुरंग अंगा आला... माझ्या साऱ्या चित्तवृत्ती आणि देहाचा रोम न् रोम पांडुरंगमय झाला. मी अगदी तृप्त आहे. मला देवाखेरीज काही सुचत नाही. आता इंद्रियांची हाव उरली नाही. आता तुका आणि पांडुरंग एकच झालेत. आधी होता संतसंग । तुका झाला पांडुरंग ॥ त्याचे भजन राहिना । मूळ स्वभाव जाईना।।'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: भा.द.खेर \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":67638779609410,"sku":null,"price":351.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/tukajhalapandurang-f.jpg?v=1790935397","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/tuka-zala-pandurang","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}