Akshardhara Book Gallery
Tuzyachsathi (तुझ्याचसाठी)
Tuzyachsathi (तुझ्याचसाठी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Janhvi Kishor Mane
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 88
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
तुझ्याचसाठी
कविता हा अंतरात्म्याचा आवाज असतो. कवी कवितेतून बोलत असतो. वाचक कवितामय होऊन वाचत असतो. अशावेळी कवीचे आणि वाचकाचे एक नाते निर्माण होते. कवीची प्रतिभा आणि त्याच्या कवितेतली प्रतिमा यांचे काही रूप त्यात आलेले असते. सहजता-गंभीरता-एकरूपता या सगळ्यातून संवेदनांना स्वतंत्र रूप देऊन केलेली मांडणी वेगळ्या पद्धतीने आलेली असते. इथे केवळ कवीचे व्यक्त होणे आणि ते अनुभवणे महत्त्वाचे असते. कवितेतून कवीचे जगणे जसे व्यक्त होते आहे, तसेच ते कवितेतून येते आहे.किंबहुना जगण्याच्या तात्विक अधिष्ठानाला कवितेतून मांडता यायला हवे. या अर्थाने कवी हा स्वानुभवातून आपला जीवनप्रवास व्यक्त करत असतो. -- डॉ. चंद्रकांत पोतदार मराठी विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
प्रकाशक :भाग्यश्री प्रकाशन
