{"product_id":"uttar-pradeshchi-khidki","title":"Uttar Pradeshchi Khidki (उत्तर प्रदेशची खिडकी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eउत्तर प्रदेशची खिडकी \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"विमलचंद्र यांच्या कथा लेखकाचा हात लिहिता असण्याच्या काळात मराठीत येणे मला महत्वाचे वाटते. कारण आपल्याकडे हिंदी सोपे या जाणिवेतून भरताड अनुवाद भरपूर झाले. जे चांगले आले, त्यात प्रेमचंदांपासून उदय प्रकाश यांच्यापर्यंतच्या क्लासिक कहाण्या खूपच उशिराने मराठी वाचकांना वाचायला मिळाल्या. चिन्मय पाटणकर आणि रोहन प्रकाशन यांनी विमलचंद्र यांच्या या कहाण्यांना त्या हिंदीत गाजत असतानाच मराठीत आणण्याची वाट सुकर करून दिली. या कथा मराठीत येताना बिघडल्या अथवा बिथरल्या नाहीत. तर, मूळ हिंदीतल्या काही कथा आज एक तपानंतर मराठी वाचतानाही पहिल्या वाचनासारखे त्यांत अडकून राहता आले. ...हा लेखक आपल्याला पारावर बसून गोष्ट सांगण्याच्या थाटात सुरु होतो. आपण त्याच्या सांगण्याच्या शैलीने भारावून जातो कारण असा किस्सानिष्णात प्रकार खूप लेखक वाचूनदेखील आपल्यापर्यंत पोहोचलेला नसतो.\" पंकज भोसले (प्रस्तावनेतून) \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक: विमलचंद्र पाण्डये \u003cbr\u003eअनुवाद: चिन्मय पाटणकर \u003cbr\u003eसंपादन: नीता कुलकर्णी \u003cbr\u003eप्रस्तावना: पंकज भोसले \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रकाशक: रोहन प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":54214862569794,"sku":null,"price":247.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/UttarPradeshchiKhidkiF.jpg?v=1780053482","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/uttar-pradeshchi-khidki","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}