{"product_id":"uttarayan-parivartanachya-disha","title":"Uttarayan : Parivartanachya Disha (उत्तरायण : परिवर्तनाच्या दिशा)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eउत्तरायण : परिवर्तनाच्या दिशा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eज्ञानाएवढेच अज्ञानही अनंत आहे. पहिल्याचा अंत दिसत नाही आणि दुसऱ्याचा आरंभ हाती येत नाही. दिवस संपू नये आणि रात्रीचा मागमूस लागू नये अशीच काहीशी संध्याछायेसारखी ही स्थिती आहे. मात्र ही सायंकाळ अल्पजीवी असली तरी आपला तिच्यातला प्रवास अंतहीनच वाटू लागतो, असे का? काळ बदलला, स्थिती बदलली; पण त्यातले चालणे सुरूच राहिले. त्याला थांबा का नाही? जरा कुठे विसावून मागोवा घ्यावा असे मनातही येत नाही... झालेच तर पुढच्या प्रवासाचा अंदाज घ्यावा असेही का वाटत नाही? यात चालणे आहे, थकणे आहे आणि नुसतीच ओढाताण आहे. सर्वोच्च पदावरची माणसे अस्वस्थ, ज्ञानवंत म्हणविले गेलेले अशांत आणि सामान्य माणसे...? ती तर नुसतीच चाचपडणारी अन् काहीएक हाती न लागलेली. जे लागले तेही पुढल्या क्षणी मातीमोल वाटून घेणारी. या धडपडीला शेवट नाही आणि तिच्यातल्या प्राप्तीलाही पूर्णता नाही. अपुऱ्या जीवाचा हा एक अंतहीन प्रवास आहे. गवसले तेच पूर्ण समजायचे आणि त्यातच रमून थांबायचे असेल तर मग जगण्यात आणि मरण्यात कोणते अंतर राहते ? अशा वेळी मनात येते, या अंतराची वाटचाल हेच आयुष्य आहे काय? या प्रश्नाला धर्माजवळ उत्तर नाही, तत्त्वज्ञान ते देत नाही आणि विज्ञानाला तर ते द्यायचेही नाही...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. सुरेश द्वादशीवर \u003cbr\u003eप्रकाशक. मनोविकास प्रकाशन \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52984608817474,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/UttarayanF.jpg?v=1777531063","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/uttarayan-parivartanachya-disha","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}