{"product_id":"vedant-dharma-v-shastre","title":"Vedant, Dharma V Shastre (वेदान्त, धर्म  व शास्त्रे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eवेदान्त, धर्म  व शास्त्रे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eविसाव्या शतकाच्या सुरुवातीला न्यूटनप्रणीत भौतिकशास्त्राच्या सिद्धातांना नवीन क्वान्टम सिद्धांताच्या क्रांतिकारक शोधामुळे तडे पडले. त्याच्या आद्य शिल्पकारांपैकी श्रोडिंगर ह्या नोबेल पारितोषिक प्राप्तकर्त्यापासून त्यानंतर ६० वर्षांनी अलीकडच्या जोसेफसन ह्या नोबेल पारितोषिक प्राप्तकर्त्यापर्यंत काही विश्वविख्यात शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील अत्याधुनिक शोध आणि सुमारे ३ ते ५ हजार वर्षांपूर्वी वेदान्तात प्रकट केलेले विचार यात आढळून आलेले साम्य अत्यंत आश्चर्यचकित करणारे वाटले. ह्याचे थोडक्यात व सुबोध भाषेत विवरण, त्याची कारणमीमांसा आणि त्यात वेदान्ताचा व धर्म ह्या संकल्पनेचा वाटा, याबद्दल मूळ आधारांसह ह्या पुस्तकात विशद केले आहे. त्याचबरोबर धर्म ह्या संकल्पनेचे खरे स्वरूप, लोकस्य अथवा विश्वस्य धारणा, ती संकुचित चौकटीत बंदिस्त केलेल्या रिलिजन ह्या संज्ञेपेक्षा किती निराळी आहे, तिचे खरे उद्दिष्ट, स्वरूप, मानवहितलक्ष्यी कार्यक्षमता, देशकालपरिस्थिती विचारात घेऊन मानवहित साधण्याची क्षमता, याचा विकृत अर्थ केल्यामुळे भारतीयांची व एकदंर मानवसमाजाची कशी हानी होत आली आहे, ह्याचेही स्पष्ट दिग्दर्शन पुराव्यासह केले आहे. चिकित्सक दृष्टीने संशोधन करून, सत्याधिष्ठित, संगतवार, बोधप्रद व वाचकाच्या डोळ्यांत अंजन घालून, काही शतके प्रचलित असलेल्या धर्माविषयीच्या विकृत कल्पनांचे निर्मूलन करून, त्याला शुद्ध व नवीन दृष्टी देऊन विचारप्रवर्तक करणारे असे या विषयावर दुसरे पुस्तक नाही. ह्यातील काही माहिती व विचार तर वाचकाला आश्चर्याचा धक्का देणारे आहेत. प्रत्येक मराठी वाचकाने पुनः पुन्हा वाचावे व संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक. डॉ. पंढरीनाथ प्रभू \u003cbr\u003eप्रकाशक. ग्रंथाली \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":52971901780290,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/VedantDharmavShashtreF.jpg?v=1777200297","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/vedant-dharma-v-shastre","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}