{"product_id":"visarlele-pune","title":"Visarlele Pune (विसरलेले पुणे)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVisarlele Pune (विसरलेले पुणे)\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुणे शहर ही जरी या पुस्तकातील मध्यवर्ती संकल्पना असली तरीही त्यातील \u003cbr\u003eविषय मात्र थोडे वेगळे आहेत. ज्यांविषयींच्या पुसटशा आठवणीही लोकांच्या \u003cbr\u003eस्मरणात उरलेल्या नाहीत अशा अनेकविध गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका दृष्टीने, काय हरवले? यापेक्षाही काय गमावले? काय काय विस्मृतीत गेले ? \u003cbr\u003eहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुन्या पिढीच्या सर्रास वापरात असलेल्या परंतु \u003cbr\u003eकालौघात आपले अस्तित्व साफ नामशेष झालेल्या, तथापि नव्या पिढ्यांच्या \u003cbr\u003eस्मरणातही नसलेल्या अशा अनेक बाबींचा लेखाजोखा यात मांडलेला आहे. \u003cbr\u003eगेल्या पाऊणशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची ही एका परीने उजळणीच आहे असे \u003cbr\u003eमानण्यास हरकत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमाझ्या पिढीतील मंडळींच्या स्मरणात असणारे, त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले \u003cbr\u003eजग जर पन्नास वर्षांच्या कालौघात हरवून जात असेल, विस्मरणात जात \u003cbr\u003eअसेल तर आजच्या नवीन पिढीतील मंडळींना ते कसे समजणार ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतथापि, हे कुणीतरी त्यांना मुद्दाम सांगायला पाहिजे आणि केवळ याच \u003cbr\u003eविचाराने मी ठरवले की, माझ्याच नव्हे तर माझ्या मागील पिढ्यांनी गेल्या \u003cbr\u003eशंभर वर्षांत अनुभवलेल्या, प्रत्यक्ष जगलेल्या त्या भूतकाळाबद्दलची कहाणी \u003cbr\u003eविस्तृत रूपात लिहून नववाचकांसमोर मांडायची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचकांना, गतकाळातील या आगळ्यावेगळ्या संकल्पना निश्चितच भावतील \u003cbr\u003eअशी अपेक्षा आहे आणि याच हेतूने सदर पुस्तक त्यांच्या हाती देताना मला \u003cbr\u003eनक्कीच आनंद वाटत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक : डॉ. अविनाश सोवनी \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Akshardhara Book Gallery","offers":[{"title":"Default Title","offer_id":55806128652610,"sku":null,"price":1350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0800\/1214\/9058\/files\/Visarlelepunef.jpg?v=1786020874","url":"https:\/\/akshardhara.com\/products\/visarlele-pune","provider":"Akshardhara Book Gallery","version":"1.0","type":"link"}